शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

पालिका इस्पितळात केवळ २६० डॉक्टर्स

By admin | Updated: March 31, 2015 03:57 IST

बृहन्मुंबई महापालिकेच्या इस्पितळात ५०० डॉक्टरांची मागणी असताना प्रत्यक्षात २६० डॉक्टर्स उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. डॉक्टरांचे मनुष्यबळ पुरेसे नाही हे

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या इस्पितळात ५०० डॉक्टरांची मागणी असताना प्रत्यक्षात २६० डॉक्टर्स उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. डॉक्टरांचे मनुष्यबळ पुरेसे नाही हे खरे असले तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉक्टरांची संख्या व कामाचे वाटप केले गेलेले असल्याने याबाबत रिव्ह्यू पिटीशन करण्यात येईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले.राहुल नार्वेकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. नार्वेकर म्हणाले की, दरवर्षी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून १०४६ डॉक्टर्स उत्तीर्ण होतात. मात्र प्रत्यक्षात २५० डॉक्टर्स मुंबईकरांना सेवा देण्याकरिता उपलब्ध होतात. महापालिकेच्या दवाखान्यांत २०११ पासून ‘झीरो फ्लोअर बेड’ ही योजना लागू केलेली आहे.महापालिकेच्या इस्पितळात ५०० बॉन्डेड डॉक्टर्सची गरज असताना निम्मे डॉक्टर्सही उपलब्ध होत नाहीत. राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, नार्वेकर यांनी दिलेली माहिती वास्तववादी आहे. २०११ साली महापालिकेच्या सेवेतील डॉक्टर मुंबई उच्च न्यायालयात गेले. डॉ. पाटील म्हणाले की, महापालिकेच्या अखत्यारितील १७४ दवाखाने, १८३ प्राथमिक आरोग्यकेंद्रे, २८ प्रसूतीगृहे, १८ रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये आणि ४ प्रमुख रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज ४५ हजार रुग्ण तपासणीकरिता येतात. या रुग्णालयांत दरवर्षी बाह्यरुग्ण विभागात ८० लाख तर आंतररुग्ण विभागात ३ लाख रुग्णांवर उपचार होतात. ७५ हजार प्रसुती व १ लाख ५० हजार शस्त्रक्रिया केल्या जातात. मुंबई व परिसरातून महापालिका इस्पितळात उपचारांसाठी ५२ टक्के तर महाराष्ट्र व इतर राज्यातून ४८ टक्के रुग्ण येतात. विद्या चव्हाण, जयंत पाटील, हेमंत टकले यांनी चर्चेत भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)