शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

..तर कारवाई मागे घेणार, निलंबित कर्मचाऱ्यांवर कृपा; राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 05:41 IST

निलंबन ही प्रशासकीय स्वरुपाची कारवाई असली तरी शासकीय कर्मचाऱ्यास दीर्घकाळ निलंबित ठेवल्याने त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो

मुंबई : ‘सस्पेन्शन इज नॉट द पनिशमेन्ट’ असे कायदा म्हणतो. खरेतर चौकशीआड संबंधित कर्मचारी, अधिकारी येऊ नयेत म्हणून केलेली निलंबन ही एक प्रशासकीय कारवाई असते, पण महिनो न्  महिने निलंबित राहण्याची वेळ अनेकांवर येते. आता निलंबनाचा कालावधी, कारवाईचे स्वरूप याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या आहेत. 

निलंबनाच्या दिनांकापासून तीन महिन्यांत डीई म्हणजे विभागीय चौकशी किंवा न्यायिक कार्यवाही सुरू केली नसल्यास, तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर निलंबन पुढे चालू ठेवता येणार नाही. सक्षम प्राधिकाऱ्याने अशा प्रकरणी कर्मचाऱ्यास पुन्हा नियमित सेवेत घ्यावे असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. निलंबनाचा कालावधी मोजताना तो कॅलेंडर महिन्यात मोजला जाणार आहे.     

उदा. १० जानेवारी रोजी निलंबित  झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या निलंबनाचा तीन महिन्यांचा कालावधी हा ९ एप्रिल रोजी पूर्ण होईल. निलंबनास तीन महिन्यांच्या कालावधीनंतरही मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्यास अशी मुदतवाढ कमीतकमी कालावधीसाठी असावी. तसेच ही मुदतवाढ एकावेळी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची नसेल.

शासकीय कर्मचारी प्रतिनियुक्तीवर असताना निलंबित झाला असेल तर कोणत्या परिस्थितीत निलंबनाचा आदेश काढणे अपरिहार्य होते हे नमूद करावे लागेल. एखादा कर्मचारी सहा महिन्यांसाठी निलंबित झाला, पण त्याच्याविरुद्धच्या खटल्याचा निकाल चारच महिन्यात लागला आणि सरकारने त्याविरुद्ध अपील केले तरीही त्या कर्मचाऱ्याचे निलंबन तत्काळ मागे घेतले जाणार आहे. 

सरकारला काय वाटते? निलंबन ही प्रशासकीय स्वरुपाची कारवाई असली तरी शासकीय कर्मचाऱ्यास दीर्घकाळ निलंबित ठेवल्याने त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. निलंबनाच्या कालावधीत शासनास त्याच्या सेवा उपलब्ध होत नाहीत आणि त्याच्या निर्वाहभत्ता व इतर भत्त्यांच्या स्वरुपात खर्चही शासनाला सोसावा लागतो, त्यामुळे वाजवीपेक्षा जास्त कालावधीसाठी निलंबित ठेवले जाणार नाही याची दक्षता सक्षम प्राधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेत बजावण्यात आले आहे.

मुख्यालय बदलता येईलनिलंबित कर्मचारी हा पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू शकत नाही असा नियम आहे. तथापि, निलंबित कर्मचाऱ्याने त्याचे मुख्यालय बदलण्याची विनंती केली असेल तेव्हा अशा बदलामुळे शासनावर प्रवास भत्ता आदीसारखा कोणताही जादा आर्थिक भार पडणार नसेल वा अन्य कोणतीही गुंतागुंत होणार नसेल तर यापुढे मुख्यालय बदलण्याची अनुमती दिली जाईल. निलंबनाच्या दिनांकापासून तीन महिन्यांत शिस्तभंगविषयक वा न्यायिक कार्यवाही सुरू झालेली नाही अशी प्रकरणे निलंबन आढावा समितीसमोर सादर करू नयेत. निलंबन मागे घेण्यात येत असल्याचे आदेश काढावेत असे आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याची चौकशी विनाकारण लांबण्याला चाप बसणार आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकार