‘...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई’; बेकायदेशीर परदेशी नागरिकांना हाकलणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 08:18 IST2026-03-18T08:18:13+5:302026-03-18T08:18:44+5:30

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारकडून स्थलांतर (इमिग्रेशन) नोंदींची पडताळणी करणारी एक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. 

then action will be taken against the officials too Illegal foreign nationals will be deported | ‘...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई’; बेकायदेशीर परदेशी नागरिकांना हाकलणार 

‘...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई’; बेकायदेशीर परदेशी नागरिकांना हाकलणार 


मुंबई : अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवरच नव्हे, तर गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या किंवा कारवाई करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. भाजपच्या स्नेहा दुबे व अन्य सदस्यांनी पालघर, नाशिक, चंद्रपूर जिल्ह्यातील अमली पदार्थविक्रीबाबत प्रश्न विचारला होता. 

इमिग्रेशन नोंदणीची पडताळणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारकडून स्थलांतर (इमिग्रेशन) नोंदींची पडताळणी करणारी एक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. 

वसई-विरारमध्ये ३० ठिकाणी छापे
वसई - विरार भागात भागात ३० ठिकाणी छापे टाकले असून, ११ कोटींचे अमली पदार्थ जप्त केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बेकायदा अमली पदार्थ विकणाऱ्या कॅफे व दुकानांवर  कारवाई करावी, असे आदेश अंमलबजावणी पथकांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title : अधिकारियों पर भी कार्रवाई; अवैध विदेशी नागरिक होंगे निष्कासित

Web Summary : महाराष्ट्र सरकार ड्रग अपराधियों को संरक्षण देने वाले अधिकारियों पर कार्रवाई करेगी। अवैध विदेशी निवासियों के लिए सत्यापन प्रणाली शुरू। वसई-विरार में छापे, ₹11 करोड़ की ड्रग्स जब्त। ड्रग्स बेचने वाले कैफे पर कार्रवाई होगी।

Web Title : Action against officials too; Illegal foreign citizens to be deported.

Web Summary : Maharashtra government will act against officials protecting drug criminals. Verification system started for illegal foreign residents. Raids in Vasai-Virar seized drugs worth ₹11 crore. Cafes selling drugs will face action.