Devendra Fadnavis Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. शनिवारी सांयकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम मुंबईतील लोकभवनामध्ये पार पडला. अजित पवारांच्या निधनाला काही दिवस झालेले असतानाच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर या घडामोडी घडल्या. त्यांनी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःखाच्या काळातही घेतलेल्या महाराष्ट्र हिताच्या निर्णयाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. "प्रसंग कठीण होता पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे", असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
"शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदींनी दिल्या कार्यासाठी शुभेच्छा
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील."
अमित शाह काय म्हणाले?
"महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्रीमती सुनेत्रा पवार जी यांचे हार्दिक अभिनंदन. अजित पवार जी आयुष्यभर शेतकऱ्यांचे कल्याण, महिला सक्षमीकरण आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी समर्पित होते. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणार आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती द्याल", अशा शब्दात अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.
Web Summary : Devendra Fadnavis lauded Sunetra Pawar's courageous decision to serve Maharashtra during a difficult time, following her swearing-in as Deputy Chief Minister. He expressed confidence in her ability to carry forward Ajit Pawar's legacy. Narendra Modi and Amit Shah also extended their best wishes.
Web Summary : देवेंद्र फडणवीस ने सुनेत्रा पवार के उपमुख्यमंत्री के रूप में शपथ लेने के बाद कठिन समय में महाराष्ट्र की सेवा करने के उनके साहसी निर्णय की सराहना की। उन्होंने अजित पवार की विरासत को आगे बढ़ाने की उनकी क्षमता पर विश्वास जताया। नरेंद्र मोदी और अमित शाह ने भी शुभकामनाएं दीं।