शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकी वाचविण्याचे प्रयत्न? कोकाटेंबाबत निकालाची प्रत विधिमंडळाला मिळालीच नाही; नार्वेकरांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:34 IST

नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे आमदार सुनील केदार यांना जिल्हा बँक घोटाळ्यात कैदेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षे कैदीची शिक्षा सुनावल्यानंतर आता आमदार म्हणून त्यांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. या निकालाची प्रत अद्याप विधान मंडळाला मिळालेली नाही.

नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे आमदार सुनील केदार यांना जिल्हा बँक घोटाळ्यात कैदेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. आता कोकाटे यांच्यासाठी नार्वेकर यांनी तोच न्याय लावावा, अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत, त्यामुळे नार्वेकरांची भूमिका या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे.

नार्वेकर काय भूमिका घेणार ?नाशिकच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत आपल्याकडे आल्यानंतर आपण निर्णय घेऊ अशी भूमिका नार्वेकर यांनी घेतली आहे. तसेच महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्याशी सल्लामसलत करण्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे तत्काळ पोहोचवण्याची व्यवस्था करू, असे शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

...ती प्रत ग्राह्य धरली जात नाहीआपल्याला सुनावलेल्या शिक्षेविरोधात कोकाटे हे वरच्या न्यायालयात धाव घेणार आहेत. तेथे त्यांच्या शिक्षेला लगेच स्थगिती मिळाली तर त्यांची आमदारकी वाचेल अशी शक्यता आहे. अशी स्थगिती मिळावी आणि कोकाटे यांची आमदारकी वाचावी अशी खेळी खेळली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते करत आहेत. अशा निकालाची प्रत न्यायालयाकडून किंवा पोलिस विभागाकडून विधानमंडळ सचिवालयाकडे येणे अपेक्षित असते. मात्र ती अद्याप आमच्याकडे आलेली नाही. खासगी व्यक्तीकडून आलेली प्रत ग्राह्य धरली जात नाही, असे राहुल नार्वेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेRahul Narvekarराहुल नार्वेकरvidhan sabhaविधानसभा