'खरात प्रकरण आणि मंत्री झिरवाळांच्या व्हिडीओमुळे सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:46 IST2026-03-26T16:45:02+5:302026-03-26T16:46:12+5:30

Harshwardhan Sapkal News: सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नरहरी झिरवाळांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

The Kharat case and Minister Jirwala's video have tarnished the reputation of the government, says Harshvardhan Sapkal | 'खरात प्रकरण आणि मंत्री झिरवाळांच्या व्हिडीओमुळे सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका  

'खरात प्रकरण आणि मंत्री झिरवाळांच्या व्हिडीओमुळे सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका  

मुंबई -  सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नरहरी झिरवाळांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, एका जबाबदार लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांने अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन करणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, मंत्री नहरही झिरवाळ यांचा व्हिडीओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. याच झिरवळ महोदयांच्या मंत्रालयातील कार्यालयात दिवसाढवळ्या लाच घेताना कर्मचा-यांना अटक केल्याचे प्रकरणही ताजे आहे, त्यावेळी क्लार्कवर कारवाई करण्यात आली. नरहरी झिरवळ यांनी साधेपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करू नये. भोळ्या चेहऱ्यामागे खूपकाही दडलेले आहे असे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कोणताही विलंब न करता नरहरी झिरवाळ यांना मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात डझनभर मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग आहेच पण सर्वात लाजीरवाणी बाब म्हणजे महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचेच घनिष्ट संबंध असावेत हे अत्यंत लांछणास्पद आहे, चाकणकरांना  राजीनामा द्यावा लागला असला तरी त्यांच्याकडे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे अध्यक्षपद अद्याप कायम आहे. चाकणकर यांच्यानंतर नरहरी झिरवाळांचा प्रताप समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र यावर काहीही भाष्य केलेले नाही. सुनेत्रा पवार यांनी या दोघांनाही सर्व पदावरून मुक्त करावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title : खर्रात कांड, मंत्री झिरवाल वीडियो से सरकार उजागर: हर्षवर्धन सपकाल

Web Summary : हर्षवर्धन सपकाल ने मंत्री नरहरि झिरवाल को एक कथित अभद्र वीडियो पर बर्खास्त करने की मांग की, उनके व्यवहार को शर्मनाक और अनैतिक बताया। उन्होंने झिरवाल के पिछले भ्रष्टाचार के आरोपों की आलोचना की और मांग की कि सुनेत्रा पवार शामिल सदस्यों को पदों से हटाएं। खर्रात कांड में राज्य महिला आयोग की प्रमुख सहित मंत्री और अधिकारी शामिल हैं।

Web Title : Kharaat Scandal, Minister Zirwal Video Expose Government, Says Harshvardhan Sapkal

Web Summary : Harshvardhan Sapkal demands Minister Narhari Zirwal's dismissal over an alleged indecent video, calling his behavior shameful and unethical. He criticizes Zirwal's past corruption allegations and demands Sunetra Pawar remove involved members from positions. The Kharaat scandal involves ministers and officials, including the State Women's Commission head.