'मला आणि महाराष्ट्राला वाटणाऱ्या शंका…’, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:49 IST2026-02-27T13:48:21+5:302026-02-27T13:49:00+5:30

Rohit Pawar News: रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या दुर्घटनेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच यासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

"The doubts I and Maharashtra have...", Rohit Pawar's big statement after meeting the Chief Minister | 'मला आणि महाराष्ट्राला वाटणाऱ्या शंका…’, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचं मोठं विधान

'मला आणि महाराष्ट्राला वाटणाऱ्या शंका…’, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचं मोठं विधान

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूच्या तपासावरून आमदार रोहित पवार हे कमालीचे आक्रमक झाले आहेत. पत्रकार परिषदांच्या माध्यमातून रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या झालेल्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करत संबंधित विमान कंपनीवरही गंभीर आरोप केले होते. दरम्यान, रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या दुर्घटनेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच यासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे १० मिनिटे झालेल्या चर्चेनंतर रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी भेटलो. या भेटीवेळी मी २८ जानेवारी रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्या झालेल्या मृत्यूबाबत ज्या शंका माझ्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवल्या. तसेच पत्र आणि पत्रकार परिषदेमधून मी जी माहिती मांडली, ती माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली. असे रोहित पवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, हा लढा मी एकट्याने लढत आहे असे नाही. या लढ्यात मला अनेक अजितदादाप्रेमी कार्यकर्ते, पदाधिकारी विविध पक्षातील कार्यकर्ते, समाजमाध्यमांवर व्यक्त होत असलेली महाराष्ट्रातील जनता आणि प्रसारमाध्यमांमधूनही पाठिंबा मिळत आहे. अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना आहे. त्यामुळे आज झालेल्या भेटीवेळी मी सगळे रिसर्च पेपर आणि  मला जी काही माहिती मिळाली ती माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. मुख्यमंत्री हे मोठे नेते असतात. तसेच त्यांचं केंद्रातही सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करून प्रयत्न करावे, अशी मागणी मी केली. तसेच त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली, असेही रोहित पवार यांनी सांगितले. 
 

Web Title : रोहित पवार ने उठाए सवाल, अजित पवार की मौत पर सीएम से मांगी मदद।

Web Summary : रोहित पवार ने सीएम फडणवीस से मुलाकात कर अजित पवार की मौत की जांच की मांग की। उन्होंने दस्तावेज और जन चिंताएं साझा कीं, न्याय के लिए केंद्र सरकार के हस्तक्षेप का अनुरोध किया। सीएम ने सकारात्मक प्रतिक्रिया दी।

Web Title : Rohit Pawar voices doubts, seeks CM's help in Ajit Pawar's death.

Web Summary : Rohit Pawar met CM Fadnavis, urging probe into Ajit Pawar's death. He shared documents and public concerns, requesting central government intervention for justice. CM responded positively.