ठाणे - एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 19:41 IST2017-10-17T19:41:49+5:302017-10-17T19:41:54+5:30
घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन त्याने पीडित मुलीला पाणी देण्याच्या बहाण्याने दरवाजा बंद करून जवळ बोलविले आणि तिचा विनयभंग केला.

ठाणे - एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
ठाणे : एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात शिरून १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणा-या शमशाद शाह (२४, रा. राबोडी, ठाणे) याला मंगळवारी राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी ठाणे न्यायालयाने दिली आहे.
पहिली राबोडीतील उस्मानिया मस्जीदजवळ शमशाद हा १६ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वातानुकूलीत यंत्र दुरुस्तीसाठी आला होता. त्यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन त्याने पीडित मुलीला पाणी देण्याच्या बहाण्याने दरवाजा बंद करून जवळ बोलविले आणि तिचा विनयभंग केला. तिच्या पालकांनी राबोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केल्यानंतर पहाटे ५ वा. च्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. उपनिरीक्षक हर्षल गावित हे अधिक तपास करीत आहेत.