फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवा, मराठ्यांना तीन महिन्यात आरक्षण : नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 07:01 PM2020-11-30T19:01:28+5:302020-11-30T19:04:46+5:30

Maratha Reservation, Devendra Fadnavis, sindhudurg, niteshrane, kankvali राज्य सरकार कुठल्याही समाजाच्या आरक्षणला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. तशी तरतूद राणे समितीच्या अहवालामध्ये केलेली आहे.त्या तरतूदीनुसार मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले होते. तसेच तामिळनाडू सरकारनेही आपल्या राज्यात दिलेले आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ शकतो. फक्त ठाकरे सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

Thackeray government has no mentality to give reservation to Maratha community: Nitesh Rane | फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवा, मराठ्यांना तीन महिन्यात आरक्षण : नितेश राणे

फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवा, मराठ्यांना तीन महिन्यात आरक्षण : नितेश राणे

Next
ठळक मुद्देमराठा समाजाला आरक्षण देण्याची ठाकरे सरकारची मानसिकता नाही ! : नितेश राणे यांची टीका देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवा, मराठ्यांना तीन महिन्यात आरक्षण : नितेश राणे

कणकवली : राज्य सरकार कुठल्याही समाजाच्या आरक्षणला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. तशी तरतूद राणे समितीच्या अहवालामध्ये केलेली आहे.त्या तरतूदीनुसार मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले होते. तसेच तामिळनाडू सरकारनेही आपल्या राज्यात दिलेले आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ शकतो. फक्त ठाकरे सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाबाबत सोमवारी कणकवली येथे प्रसिद्धिमाध्यमानी विचारलेल्या प्रश्नाला आमदार राणे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मराठा समाज आरक्षणाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमाणेच आमचे मत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना करा. अवघ्या तीन महिन्यात आम्ही मराठ्यांना आरक्षण देवू.

सरकारच्या हातात वेगवेगळे मार्ग असतात. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण त्यानुसार देता येईल. मराठा समाजाला आरक्षण देणे हे आता राज्य सरकारच्या हातात आहे . मात्र, त्यांच्याकडून हवे तसे प्रयत्न होत नाहीत. त्यासाठी आम्ही शंभर मार्ग या सरकारला दाखवू शकतो. त्यासाठी त्यांनी आम्हाला एकाच व्यासपीठावर बोलवावे. पण, मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची मानसिकताच नाही. त्यामुळे हा निर्णय खऱ्या अर्थाने अडकला आहे. अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.
 

Web Title: Thackeray government has no mentality to give reservation to Maratha community: Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.