शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 19:00 IST

Ramdas Athawale On Prakash Ambedkar: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढल्यानंतर रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीला भेट दिली. गेल्या तीन महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंची ही सातवी भेट आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वाढत्या जवळीकतेला राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीगाठी सुरू असतानाच, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देत दलित ऐक्याबद्दल मोठे विधान केले.

रामदास आठवले म्हणाले की, "ऐक्य हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. माझ्या आवडीचा विषय आहे, पत्रकारांच्याही आवडीचा विषय आहे. परंतु, आता शिवसेनेमध्ये ऐक्य होत का ते पाहूयात. राष्ट्रवादीमध्ये ऐक्य होत का ते पाहूयात, पण जर असं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्याला माझा पाठिंबा आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहोत. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणार नाही."जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी होत आहेत, तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही भेटीगाठी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे."

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ते यापूर्वी 'मातोश्री'वर गेले होते. तसेच, सरकारने त्रीभाषा सूत्रीचा अध्यादेश रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदा एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यानंतर ठाकरे बंधूंमधील भेटीगाठी वाढल्या आहेत, ज्याला राजकीय वर्तुळात मोठे संकेत मानले जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ramdas Athawale wants meetings with Prakash Ambedkar like Thackeray brothers.

Web Summary : Ramdas Athawale welcomes possible Shiv Sena and NCP unity. He emphasizes Republican unity requires him and Prakash Ambedkar working together, mirroring the Thackeray brothers' meetings. He desires similar discussions with Ambedkar.
टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण