शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

ठाण्यात ‘बंद’ला गालबोट : कल्याण, बदलापूरमध्ये सहा पोलीस जखमी, कल्याणमध्ये शिवसेना शाखा, डोंबिवलीत रेल्वे तिकीट खिडकी फोडली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 5:10 AM

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ घोषित केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला बुधवारी ठाणे शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. कल्याणमध्ये दोन गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने झालेल्या झटापटीत सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र तडवी, पोलीस कर्मचारी विजय घुगे, सुरेश कार्ले आणि योगिता पाटेकर हे सहा पोलीस जखमी झाले.

ठाणे - भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ घोषित केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला बुधवारी ठाणे शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. कल्याणमध्ये दोन गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने झालेल्या झटापटीत सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र तडवी, पोलीस कर्मचारी विजय घुगे, सुरेश कार्ले आणि योगिता पाटेकर हे सहा पोलीस जखमी झाले. जमावाला पांगविण्याकरिता पोलिसांनी हवेत गोळीबार केला. मात्र, त्याला उशिरापर्यंत दुजोरा मिळाला नाही. बदलापूरमध्ये राजश्री नवाळे ही महिला पोलीस जखमी झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला.आंदोलनकर्त्यांनी सकाळपासूनच रस्त्यावर उतरून जबरदस्तीने बाजारपेठा बंद करण्यास भाग पाडले. दिवा, डोंबिवली-कल्याण या परिसरात रेल रोको, रास्ता रोको केले. यामुळे हॉटेल, उपाहारगृहे बंद असल्याने अनेकांचे हाल झाले. चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचता आले नाही. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील शाळा सुरू असल्या, तरी शाळेच्या बसचालकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने बहुतांश विद्यार्थी शाळेत पोहोचले नाहीत. परिणामी, अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या.आंदोलनकर्त्यांनी सकाळी महाराष्ट्र परिवहन सेवेच्या ७ आणि ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ६ बस यांच्यासह खासगी वाहनांना लक्ष्य केले. वाहनांवर झालेल्या दगडफेकीत काचा फुटल्याने नुकसान झाले. काही वाहनांची हवा काढल्याने सकाळी एसटी आणि टीएमटीसह खासगी वाहतूक संपूर्ण बंद होती. गेल्या २ दिवसांत २०हून अधिक एसटी/टीएमटीचे नुकसान झाले. बुधवारी दिवसभरात एसटीच्या हजारहून अधिक फेºया रद्द केल्याने तब्बल २६ लाखांचे नुकसान झाले.याचदरम्यान, लोकमान्यनगर परिसरात आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले, तसेच ठाणे पालिका मुख्यालय बंद करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाºयांनी ठाणे जिल्ह्यात ४ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.डोंबिवलीत आंदोलनकर्त्यांनी रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीच्या काचा फोडल्या, तर कल्याणच्या पत्रीपुलावर अनेक वाहनांची तोडफोड केली. जमावाने कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवरही हल्ला केला, तसेच कल्याणच्या शिवाजी चौकात आंदोलकांचा मोठा जमाव जमला होता. भिवंडीत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयावर दगडफेक केली.शहापूर-मुरबाड, भिवंडीतील आगारांनी ‘बंद’ला लागलेले हिंसक वळण पाहून एसटीच्या फेºया रद्द केल्या होत्या.एसटीच्या १,४८७ फे-या रद्द : पालघर, बोईसर, विरार, नालासोपा-यात लोकल रोखल्यापालघर :बुधवारी जिल्ह्यातील बहुजन समाज रस्त्यावर उतरला. बहुजन समाज अन्याय, अत्याचार प्रतिकार समितीच्या नेतृत्वाखाली विविध शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. पालघर, बोईसर, विरार, नालासोपारा येथे आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकमध्ये उतरून लोकल अडविल्याने त्या उशिराने धावत होत्या. त्यातच जिल्हाभरात एसटीच्या १,४८७ फेºया रद्द झाल्याने पालघर एसटी विभागाचे लाखोंचे नुकसान झाले. आठही तालुक्यात ‘बंद’चे पडसाद उमटले.विरार, नालासोपारा येथे सकाळी ९:३० वाजल्यापासून रेल्वे रोको साठी कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्यामुळे मुंबई आणि गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक उशिराने धावत होती. दुपारी दीड वाजता आंदोलक पालघर रेल्वे स्टेशनमध्ये घुसले या वेळी पोलिसाचा विरोध मोडून डहाणू चर्चगेट लोकल काही काळा साठी अडवून ठेवली होती. शहरी भागामध्ये चौका-चौकात भीमसैनिक फिरून ‘बंद’ची हाक देत होते. त्यामुळे दुकाने, बाजारपेठा, रिक्षा, एसटी सेवा, कारखाने आदी सेवा पूर्णपणे बंद होती.मात्र, ग्रामीण भागात ‘बंद’चा फारसा प्रभाव दिसला नाही. पहाटे कामावर आलेल्या कामगारांचे कारखाने बंद करण्यात आल्याने त्यांचा रोजगार तर बुडलाच, परंतु एसटी व रिक्षा बंद असल्याने त्यांना ८ ते १० किमीचाप्रवास करून आपले घर गाठावे लागले. पालघर जिल्ह्यातील बोईसर, मोखाडा, वसई येथील भागात ‘रस्ता रोको’ करून वाहतूक रोखण्यात आली. या वेळी चोख बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonभीमा-कोरेगाव