शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हार्बरवर शुक्रवारपासून बारा डबा लोकल !

By admin | Updated: April 28, 2016 05:40 IST

पश्चिम रेल्वे मार्गावर बारा डबा लोकल धावत असतानाच हार्बरवासीयांना मात्र त्यासाठी बरीच वर्ष प्रतीक्षा करावी लागली.

मुंबई : मध्य रेल्वे मेन लाइन तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर बारा डबा लोकल धावत असतानाच हार्बरवासीयांना मात्र त्यासाठी बरीच वर्ष प्रतीक्षा करावी लागली. ही प्रतीक्षा मध्य रेल्वेने संपुष्टात आणली असून २९ एप्रिलपासून बारा डबा लोकल धावणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरुवातीला एकच लोकल हार्बर मार्गावर धावेल. हार्बरवरील १२ डबा लोकलचा प्रकल्प डिसेंबर २0१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या प्रकल्पाला दीड वर्ष विलंब झाला. हार्बरवरील बारा डब्याचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे काम हे सीएसटी स्थानकात होते. ते काम ७२ तासांत पूर्ण करून हार्बरचा मार्ग मोकळा करण्यात आला होता. तरीही वडाळा येथे मोटरमनला सिग्नल पाहण्यात होत असलेला अडथळा आणि डॉकयार्ड रोड स्थानकात प्लॅटफॉर्मची बाकी असलेली लांबी व उंची यामुळे काम आणखी रखडले होते. परंतु हे काम त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन देत ते मार्गी लावण्यात आले. अखेर हार्बरवर बारा डबा लोकल २९ एप्रिलपासून सुरू करत असल्याची घोषणा मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी बुधवारी केली. सुरुवातीला एकच लोकल धावणार असून या लोकलच्या १४ फेऱ्या होतील. सीएसटी ते पनवेल, वाशी, वडाळा ते पनवेल, वाशी या मार्गावर ही लोकल धावेल. बारा डबा लोकलमुळे प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढेल. (प्रतिनिधी)