शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर दहा ठिकाणो धोकादायक

By admin | Updated: August 2, 2014 22:49 IST

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरणाचे काम कंत्रटदाराने नियोजित कालावधीत पूर्ण केले नाही.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरणाचे काम  कंत्रटदाराने नियोजित कालावधीत पूर्ण केले नाही. तसेच कामादरम्यान आवश्यक काळजी घेतली नसल्याने, या टप्प्यात महामार्गाची दुरवस्था झाली असून वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. येत्या 2क् ऑगस्टपूर्वी हा महामार्ग वाहतुकीस सुयोग्य करुन देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे गृहनिर्माण, पर्यावरण, उद्योग व सामाजिक कल्याण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सचिन अहिर यांनी गणोशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणा:या लाखो गणोशभक्त चाकरमान्यांना दिली आहे.
 
अलिबाग : गणोशोत्सवाच्या निमित्ताने शासकीय स्तरावर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरिता आयोजित विशेष बैठकीकरीता पालकमंत्री अहिर येथे आले होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या जानेवारी ते जून अखेर झालेल्या 267 भीषण अपघातांत 53 प्रवासी ठार झाले. 2क्क् प्रवासी गंभीर जखमी तर 77 किरकोळ जखमी झाले. दरम्यान ‘लोकमत’ने सादर केलला महामार्गावरील 1क् अति धोकादायक ठिकाणांचा नकाशा स्विकारुन त्यावर तत्काळ कार्यवाही करुन पूर्तता अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश उपस्थित राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता एस. एस. वाटोळ यांना दिले. 
(विशेष प्रतिनिधी)
 
सिद्धीविनायक ट्रस्टच्या सहकार्याने गणोशभक्तांकरिता खानपान व विश्रंती 
गणोशोत्सवाकरिता कोकणात जाणा:या गणोशभक्तांना गोवा राष्ट्रीय महामार्गावर खानपान व विश्रंती सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता यंदा मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्ट बरोबर बोलणो झाले असून, त्यांनी या उपक्रमास तत्वत: मान्यता दिली असल्याचे पालकमंत्री अहिर यांनी पुढे सांगितले. ही सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता महामार्गावर जागेची गरज भासणार असून त्यासाठी रिलायन्स कंपनीच्या बंद असलेल्या पेट्रोलपंपाची जागा घेण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी  सांिगतले.
 
पळस्पे, कर्नाळा खिंड, पेण ते वडखळ टप्पा, गडब ते कोंठवी फाटा, खारकोलेटी ते कोलेटीवाडी, पळस, एटीव्ही कंपनी ते हॉटेल बिजली, खांब ते पूगांव, भूवन ते रातवड, पोटनेर 
 
4पालकमंत्री अहिर यांनी गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाची ठेकेदार कंपनी असणा:या महाविर एजन्सीच्या वरिष्ठ अधिका:यांशी संपर्क साधून समस्येचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देवून, सत्वर उपाय योजना करण्याचे सक्त आदेश दिले.
 
नितीन गडकरी, सचिन अहिर बैठकीतून गोवा महामार्गाच्या समस्या सुटणार!
गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील समस्या दूर करुन तो महामार्ग चांगल्या प्रकारे तयार करण्याकरीता केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत चर्चा होवून या कामाला गती देण्याकरीता विशेष बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान चौपदरीकरणाच्या जमीन संपादनाच्या निमित्ताने येत असलेल्या समस्या सोडविण्याकरिता आजच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ज्या जागा महामार्ग विस्ताराखाली येत आहेत परंतू त्यांच्या वारसांच्या वा अन्य कारणास्तव त्यांना पैसे अदा करता येत नाहीत अशा जमीन मालकांच्या मोबदल्याच्या रकमा बॅन्केत स्वतंत्र खाते उघडून त्यामध्ये सुरक्षित ठेवण्यात येवून जागेचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूमिसंपादनाची 5क् ते 6क् कोटी रुपयांची रक्कम अद्याप अदा करता आलेली नाही, त्या संदर्भातील प्रकरणांची छाननी येत्या 15 दिवसांत करुन ती प्रकरणो मार्गी लावून रुंदीकरणाकरीता जमीन उपलब्ध करुन देण्याचाही निर्णय झाल्याचे त्यानी सांगीतले. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियोजित मार्ग बदलून दुस:या मार्गे विस्तारीकरण करते. यातून भूमि संपादनाच्या समस्या नव्याने निर्माण होत आहेत.