१० लाख घेऊन निवडणुकीत गाडी सोडली

By Admin | Updated: December 20, 2014 01:53 IST2014-12-20T01:53:16+5:302014-12-20T01:53:16+5:30

ठाणे शहराच्या पोलीस आयुक्तांना निवडणूक काळात एका उमेदवाराच्या मोटारीत ३५ लाखांची रोकड असल्याने ती पकडण्याचे आदेश आपण दिले

Ten lakhs left the car in the elections | १० लाख घेऊन निवडणुकीत गाडी सोडली

१० लाख घेऊन निवडणुकीत गाडी सोडली

नागपूर : ठाणे शहराच्या पोलीस आयुक्तांना निवडणूक काळात एका उमेदवाराच्या मोटारीत ३५ लाखांची रोकड असल्याने ती पकडण्याचे आदेश आपण दिले. मात्र त्यांनी १० लाख रुपये घेऊन ती गाडी सोडली, असा सनसनाटी आरोप विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी शुक्रवारी विधान परिषद सभागृहात केला व त्या पोलीस आयुक्तांची चौकशी करा, असे निर्देश सरकारला दिले.
अनिल परब यांनी अंधेरी येथील पोलीस निरीक्षक नरेश कासले यांनी मद्यधुंद अवस्थेत त्यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेत कासले यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) यांच्यामार्फत चौकशी करून पुढील अधिवेशनाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही डावखरे यांनी दिले.दोन कंपन्यांच्या वादात काही मंडळींना पकडून अंधेरी पोलीस पैसे उकळत असल्याचा आरोप परब यांनी केला. पोलीस उपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून ही कारवाई केली तसेच मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचे परब यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Ten lakhs left the car in the elections