मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध, वर्षअखेरीस होणाऱ्या गर्दीवर ‘मरे’चा उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 06:47 IST2024-12-29T06:46:35+5:302024-12-29T06:47:12+5:30
प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध २९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ ला रात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील.

मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध, वर्षअखेरीस होणाऱ्या गर्दीवर ‘मरे’चा उपाय
मुंबई : वर्षअखेरीस प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी होऊ शकते हे गृहित धरून मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध २९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ ला रात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी आणि लातूर या स्थानकांवर हे निर्बंध लागू असतील. वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी त्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. गर्दीच्या काळात सुरळीत आणि सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी प्रवाशांनी नियोजन करावे आणि नव्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.