दीप्ती मोरे आत्महत्याप्रकरणी तेजस मोरेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2015 20:53 IST2015-10-12T20:53:18+5:302015-10-12T20:53:18+5:30

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलाचा खून करून स्वत: इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक

Tejas Morea arrested for Deepti's suicide | दीप्ती मोरे आत्महत्याप्रकरणी तेजस मोरेला अटक

दीप्ती मोरे आत्महत्याप्रकरणी तेजस मोरेला अटक

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ - सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलाचा खून करून स्वत: इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल रविवारी घडली होती. याप्रकरणी दीप्ती मोरे हिचा पती तेजस मोरे याला सिंहगड रोड पोलिसांनी आज अटक केली आहे. 
दीप्ती तेजस मोरे (वय ३४, रा. निखिल गार्डन सोसायटी, माणिकबाग) या महिलेने रविवारी आत्महत्या केली. तसेच, तिने अर्णव (वय ५) या मुलाच्या हाताच्या नसा कापून त्याचा खून केल्याचे समोर आले.  दरम्यान, दीप्तीने लिहिलेली चिठ्ठी  पोलिसांना सापडली असून पती- पत्नीमधील घरगुती भांडणातून दीप्तीने हे दुर्दैवी पाऊल उचलले असल्याचे समजते.  याप्रकरणी दीप्तीचा पती तेजस मोरे याला पोलिसांनी आज अटक केली असून त्याची चौकशी करत आहेत. 

Web Title: Tejas Morea arrested for Deepti's suicide