तांत्रिक बिघाडाने मेट्रो ठप्प!

By Admin | Updated: June 15, 2014 02:10 IST2014-06-15T02:10:32+5:302014-06-15T02:10:32+5:30

वर्सोव्याहून घाटकोपरला निघालेली मेट्रो रेल्वे शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास मरोळ नाका स्थानकावर बंद पडली

Technical firing metro jam! | तांत्रिक बिघाडाने मेट्रो ठप्प!

तांत्रिक बिघाडाने मेट्रो ठप्प!

मुंबई : वर्सोव्याहून घाटकोपरला निघालेली मेट्रो रेल्वे शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास मरोळ नाका स्थानकावर बंद पडली; आणि मेट्रोच्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा झाला. तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो सेवा ठप्प झाल्याच्या सूचना एमएमओपीएलच्या वतीने प्रवाशांना देण्यात आल्या. परंतु ऐन सायंकाळी हा खोळंबा झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.
शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास वर्सोव्याहून घाटकोपरकडे धावू लागलेली मेट्रो मरोळ नाका स्थानक येताच बंद पडली. दरम्यान, ऐन पीक अवरला मेट्रो बंद पडल्याने मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने घाटकोपर येथील मेट्रो स्थानकावर पुढील दोन ते तीन तास मेट्रो बंद असल्याची घोषणा केली. मात्र त्यामुळे घाटकोपरपासून वर्सोव्यापर्यंतच्या सर्वच प्रवाशांचा खोळंबा झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Technical firing metro jam!