शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

आदिवासी विद्यार्थ्यांना उलगुलानमध्ये नीटचे धडे; राज्यातील पहिला प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 4:46 PM

कुपोषणाच्या नावाने कलंकित झालेल्या मेळघाटात वैद्यकीय सेवेची विशेषत: वैद्यकीय अधिका-यांची कमतरता असते. त्यामुळे आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणा-या त्यांच्याच पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) चे धडे बिजुधावडी येथे दिले जात आहेत. 

- नरेंद्र जावरे 

परतवाडा : कुपोषणाच्या नावाने कलंकित झालेल्या मेळघाटात वैद्यकीय सेवेची विशेषत: वैद्यकीय अधिका-यांची कमतरता असते. त्यामुळे आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणा-या त्यांच्याच पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) चे धडे बिजुधावडी येथे दिले जात आहेत. धारणी प्रकल्प कार्यालय व पुणे येथील लिफ्ट इक्विपमेंट ही स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातला हा पहिला प्रयोग धारणी तालुक्यात राबविला जात आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, अकोला येथील तज्ज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून स्वखर्चाने बिजुधावडी येथे येऊन शिकवीत आहेत.तत्कालीन प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांनी पुणे येथील लिफ्ट इक्विपमेंट या स्वयंसेवी संस्थेसोबत संवाद साधून मेळघाटातही आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचे प्रशिक्षण द्यावे, यातून नीट आणि जेईईसारख्या कठीण अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या प्रशिक्षणातून व्हावी, यासाठी प्रयत्न केले. त्यांची प्रामाणिक तळमळ यशस्वी ठरली.  उलगुलानमध्ये घडतोय मेळघाटचा भावी डॉक्टर मेळघाटच्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये डॉक्टर नसल्याने आदिवासी रुग्णांसह बालकांना नाहक जीव गमवावा लागतो. तेव्हा मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांमधून डॉक्टर निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने बिजुधावडीच्या आश्रमशाळेत वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचे धडे दिले जात आहेत. ९ सप्टेंबर २०१७ रोजी या प्रकल्पाचा मुहूर्त झाला. आठवड्यातील पशनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कक्षाला उलगुलान असे नाव देण्यात आले आहे. त्यामध्ये परिसरातील राणीगाव, टेंभली, सुसर्दा, टेम्ब्रुसोंडा, बिजुधवडी या आश्रमशाळांमध्ये इयत्ता अकरावीत शिकणा?्या विज्ञान शाखेच्या प्रत्येकी दहा अशा एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर संस्थेच्या तज्ज्ञ मंडळीकडून येण्या-जाण्याच्या खर्चासकट कुठलाही न घेता मोफत नीट २०१९ वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे.  पुण्यात फडकला मेळघाटचा झेंडाजानेवारी महिन्यात एका कार्यक्रमांमध्ये आश्रमशाळेतील शांतीलाल सावलकर या आदिवासी विद्याथ्यार्ने पुण्यातील एका कार्यक्रमात उपस्थितांपुढे इंग्रजीत भाषण करून सर्वांना अचंबित केले. सराव परीक्षेत 540 गुणांपैकी अनेक विद्यार्थ्यांनी ३०० गुण पटकाविले.  बिजूधावडी आश्रमशाळेतील शिवकुमार रामलाल सावलकर या विद्याथ्यार्ने सराव परीक्षेत ३८० मिळविल्याने २०१९ च्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची योग्य दिशेने वाटचाल होत असल्याचा आत्मविश्वास प्रशिक्षक, प्रकल्प कार्यालयाने वर्तविला आहे. प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेढेकर, सुधीर चव्हाण, अतुल ढाकणे, संतोष, केतन, फारुख, परिमल, आकाश आदी सहकारी राज्यातला पहिला प्रयोग यशस्वीतेसाठी प्रयत्नरत आहेत. आदिवासी विभागामार्फत अमरावती येथे ४५ दिवसांसाठी विद्यार्थ्यांना संबंधित परीक्षेचा अभ्यासक्रम घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, परीक्षा कालावधीला वेळ आणि अमरावतीचे अंतर पाहता, बिजुधावडी येथील उलगुलानचा यशस्वी प्रयोग आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला आहे.

 स्वतंत्र कक्षाची आवश्यकताविद्यार्थी वैद्यकीय परीक्षापूर्व धडे आश्रमशाळेतील एका खोलीतच गिरवतात. त्यांना शांततापूर्ण वातावरण मिळण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी संबंधित लिफ्ट इक्विपमेंट व प्रकल्प कार्यालय प्रयत्नशील असल्याचे सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेढेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  बिजुधावडी येथे आदिवासी प्रकल्प आणि लिफ्ट इक्विपमेंट या स्वयंसेवी संस्थेमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षेचे मोफत धडे दिले जात आहे. या उपक्रमातून अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. आता मेळघाटला त्यांच्या मातीतील डॉक्टर तयार होतील.- शिवानंद पेढेकर, सहायक प्रकल्प अधिकारी, आदिवासी प्रकल्प कार्यालय, धारणी

टॅग्स :collegeमहाविद्यालयAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थी