"शिक्षकांवर संघर्षाची वेळ येणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय, एका दिवसात मागणी मार्गी लावतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:19 IST2025-07-09T14:15:57+5:302025-07-09T14:19:15+5:30

Sharad Pawar on teachers agitation in mumbai : "५६ वर्षांपासून मी राजकारणात, तरतूद कशी आणायची असते ते मला माहितीये"- शरद पवार०

teachers struggling and fighting for rights is shame for maharashtra said Sharad Pawar | "शिक्षकांवर संघर्षाची वेळ येणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय, एका दिवसात मागणी मार्गी लावतो"

"शिक्षकांवर संघर्षाची वेळ येणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय, एका दिवसात मागणी मार्गी लावतो"

Sharad Pawar on teachers agitation in mumbai : मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी खासदार नीलेश लंके यांच्यासह आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते. "शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. शिक्षकांनी काही चिंता करू नये. एका दिवसाच्या आत तुमची मागणी मार्गी लावतो," असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

शरद पवार म्हणाले, "शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी महाराष्ट्राच्या सरकारचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी. शिक्षकांवर इतर सरकारी कामाची देखील जबाबदारी असते. शिक्षकांवर ज्या पद्धतीने जबाबदारी असते. सरकारचीदेखील त्यांच्याप्रति काही जबाबदारी आहे. शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ नये. शिक्षकांच्या मागण्यांसाठी जितक्या पैशाची गरज असेल, ते देण्याची तयारी ठेवा. त्यासाठी आर्थिक तरतूद करा. शिक्षकांवर उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी आहे. अशा लोकांच्या कष्टाची किंमत टप्प्याटप्प्याने का देता?"

"शिक्षक हे नवी पिढी घडवणारा घटक असून तोच आज पावसामध्ये, चिखलामध्ये इथे बसतो. ही वेळ त्याच्यावर येत आहे. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. मला रोहित पवार यांच्याकडून समजले की, राज्याचे मंत्री इथे येत आहेत. मंत्री येत आहेत, ते ठीक आहे. ते चर्चा करतील आणि प्रश्न सोडवतील. मात्र, प्रश्न अद्याप सुटलेला नाही याचा अर्थ राज्यकर्त्यांना प्रश्न सांगावे लागेल. उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, उद्याची महाराष्ट्राची पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांना संघर्ष करायची वेळ येऊ देऊ नका. लवकरात लवकर त्यासाठी लागेल त्या निधीची तरतूद करा आणि तो द्यायला सुरूवात करा व राज्यात शिक्षकांचा सन्मानच करा," असेही शरद पवार म्हणाले.

"याबाबतचा निर्णय एका दिवसाच्या आत घ्यावा, त्यापेक्षा जास्त वेळ लावू नये. प्रशासनाचं मला थोडं फार समजतं. प्रशासनासंबंधी काही काळजी करू नका. ५६ वर्षांपासून मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये काम केलं आहे. त्यामुळे कसा निर्णय घ्यायचा, कशी तरतूद आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते ते मला माहिती आहे", असे म्हणत शिक्षकांना निश्चिंत राहण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला.

Web Title: teachers struggling and fighting for rights is shame for maharashtra said Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.