शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 14:04 IST

निर्णय घेण्यात आल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. शाळा सुरू करण्याअगोदर ही प्रक्रिया होणार पूर्ण.

ठळक मुद्देनिर्णय घेण्यात आल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.शाळा सुरू करण्याअगोदर ही प्रक्रिया होणार पूर्ण.

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी गुरूवारी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले. 

"राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत," असेही ते म्हणाले. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पद्धतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.मराठवाड्यातील अतिवृष्टीवरही भाष्यमराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शिवाय त्या - त्या जिल्हयाचे पालकमंत्री घटनास्थळी पोचले असल्याची माहिती अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. 

मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे शिवाय जमीनी खरवडून निघाल्या आहेत तर काही भागात घाट कोसळून वाहतूक ठप्पही झाली होती. याबाबत कालच मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या - त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी या सगळ्या नुकसानीची पाहणी करत आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रKeralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा