पुणे-कोल्हापूर हायवेवर बॅनरमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका प्रभा जनार्दन भोसले यांचे निधन; सातारा नजीक होते हॉटेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:14 IST2025-11-19T18:11:59+5:302025-11-19T18:14:15+5:30
शिक्षिका हॉटेल सातारा: कोल्हापूरहून पुण्याकडे येताना किंवा पुण्याहून कोल्हापूरला जाताना 'शिक्षिका प्रभा भोसले यांचे साधेसुधे घरगुती जेवण' अशी एक जाहिरात कायम दिसायची.

पुणे-कोल्हापूर हायवेवर बॅनरमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका प्रभा जनार्दन भोसले यांचे निधन; सातारा नजीक होते हॉटेल...
कोल्हापूरहून पुण्याकडे येताना किंवा पुण्याहून कोल्हापूरला जाताना 'शिक्षिका प्रभा भोसले यांचे साधेसुधे घरगुती जेवण' अशी एक जाहिरात कायम दिसायची. त्यांचे जेवणाची चवही खूप प्रसिद्ध होती. या प्रभा भोसले यांचे आज निधन झाले.
घरच्यांसारख्या आपुलकीने वागणाऱ्या, प्रेमळ व्यक्तिमत्त्व ज्यांचं हास्य, साधेपणा आणि प्रत्येकवेळी दिलेला मायेचा आशीर्वाद आज हरपला. समाजातून एक कर्तुत्ववान, प्रेमळ, आदर्श व्यक्तीचं जाणं म्हणजे सगळ्यांसाठी मोठी पोकळी निर्माण करणारं आहे, अशा शब्दांत प्रभा भोसले यांच्या हॉटेलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
सोशल मीडियावर देखील शिक्षिका, हॉटेल व्यावसायिका प्रभा भोसले यांच्या निधनावर श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे.