शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन", जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 15:23 IST

Jayant Patil : जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक विधान केलं आहे. पंधरा वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता, असे म्हटलं आहे. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अशातच जयंत पाटील हे शनिवारी (२७ जुलै)  बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्या सदस्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 

यावेळी धनंजय मुंडे यांना पाठवून अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन भाजप आणि आरएसएसचा होता का? असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप सध्या जे राजकारण करत आहे, असे राजकारण कधीच केले नाही. तो आमचाच आत्मघातकी आमचा प्लॅन होता, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळं धनंजय मुंडेंच्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

याचबरोबर, जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ''राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी ३५ कोटींची तरतूद केली असल्याची माहिती अजित पवार यांनी ट्विट करत दिली. परंतु हे ट्विट अजित पवार यांनी केलं नाही. त्यांना बळजबरीने करायला लावलं आहे. डॉन चित्रपटात बच्चनच्या पिस्तूलमध्ये गोळी नव्हती हे फक्त अभिनेत्रीलाच माहीत होते. तशी गत लाडकी बहीण योजनेची आहे", असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवारांना लगावला आहे.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड