महाराष्ट्रातही ‘नीट’चा निर्णय घ्या, नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:05 PM2021-09-22T12:05:08+5:302021-09-22T12:07:25+5:30

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले, देशभरातून १६ लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात, पण त्यातील गैरव्यवहार वाढले आहेत.

Take a decision of 'Neat' in Maharashtra too, Nana Patole's letter to the Chief Minister | महाराष्ट्रातही ‘नीट’चा निर्णय घ्या, नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रातही ‘नीट’चा निर्णय घ्या, नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next

मुंबई : देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट (NEET) परीक्षेचे आयोजन केले जाते. परंतु या परीक्षेत दिवसेंदिवस वाढणारे गैरप्रकार पाहता या परीक्षा म्हणजे व्यापम घोटाळ्याचा पुढचा अंक आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पेपर फोडून, डमी विद्यार्थी बसवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असून गरीब, मध्यमवर्गीय मुला-मुलींनी डॉक्टर होऊ नये म्हणून नीटचा वापर सुरू आहे का? असा संतप्त सवाल करून महाराष्ट्र सरकारनेही तामिळनाडूप्रमाणे ‘नीट’बाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले, देशभरातून १६ लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात, पण त्यातील गैरव्यवहार वाढले आहेत. पेपर लीक होण्याचे प्रकारही वाढीस लागल्याच्या घटना नागपूर, जयपूर सारख्या ठिकाणी घडल्या आहेत. त्यातच नीटमध्ये सीबीएससी व इतर केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या ही राज्य परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नीट परीक्षेनंतर राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांची मेडिकलमधील संख्या कमी कमी होत असून, सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाताना दिसत आहे. हे अन्याय व असमानता वाढवणारे आहे. यामुळे ग्रामीण भागातील तसेच सामान्य कुटुंबातील विद्यार्थांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न धुळीस मिळत आहे. या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने नीट परीक्षा रद्द करावी व राज्य बोर्डाच्या गुणांवरच प्रवेश दिला जावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे पटोले यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच’  -
-  महिला सुरक्षेच्या प्रश्नावर २ दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, ही राज्यपालांची सूचना व त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर नाना पटोले म्हणाले, महिला सुरक्षेचा प्रश्न हा काही फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून देशभरातील महिलांचा प्रश्न आहे. 
-  संसदेचे ४ दिवसांचे अधिवेशन बोलवावे हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर योग्यच आहे, असेही ते म्हणाले. 
 

Web Title: Take a decision of 'Neat' in Maharashtra too, Nana Patole's letter to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.