दीक्षितांवर कारवाई करा

By Admin | Updated: December 29, 2014 05:56 IST2014-12-29T05:56:39+5:302014-12-29T05:56:39+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना संतापली असून, दीक्षित यांनी पुरावे द्यावे

Take action on the sentences | दीक्षितांवर कारवाई करा

दीक्षितांवर कारवाई करा

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना संतापली असून, दीक्षित यांनी पुरावे द्यावे अन्यथा सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई महापालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार असून, हा भ्रष्टाचार थांबला तर या शहरातील फ्लॅटचे दर प्र्रति चौरस फूट किमान ५०० रुपयांनी कमी होतील, असा गौप्यस्फोट दीक्षित यांनी पंढरपूर येथे बोलताना केला होता. शिवसेनेचे खासदार व दीर्घकाळ मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहिलेल्या राहुल शेवाळे यांनी या वक्तव्याला आक्षेप
घेतला आहे. दीक्षित यांचे
वक्तव्य बेजबाबदारपणाचे असून, त्यांच्याकडे पुरावे असल्यास शिवसेना
खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. मात्र तसे पुरावे दीक्षित देणार नसतील तर त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे घरे महाग होत असतील तर ही गंभीर बाब असून, मुख्यमंत्र्यांनी दीक्षित यांच्या वक्तव्याची दखल घेत चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दीक्षित यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Take action on the sentences