शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सात मंत्र्यांवर कारवाई करा

By admin | Updated: June 5, 2016 01:24 IST

एकनाथ खडसे यांनी दिलेला राजीनामा हा संपूर्णत: काँग्रेसच्या आंदोलनाचे यश आहे. केवळ खडसे यांच्या राजीनाम्याने भागणार नाही. सध्याच्या युती सरकारमधील सात मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत

मुंबई : एकनाथ खडसे यांनी दिलेला राजीनामा हा संपूर्णत: काँग्रेसच्या आंदोलनाचे यश आहे. केवळ खडसे यांच्या राजीनाम्याने भागणार नाही. सध्याच्या युती सरकारमधील सात मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत. त्या सगळ्यांवर कारवाई करून जेलमध्ये टाकल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही. या सातही मंत्र्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी घुसू, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला. भ्रष्ट मंत्र्यांवरील कारवाई आणि मुंबई महापालिकेच्या कारभाराविरोधात काँग्रेसच्या वतीने शनिवारी धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी बोलताना निरुपम म्हणाले की, ‘एकनाथ खडसे यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही. मोक्का कायद्यांतर्गत, तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक करावी. या सरकारमधील ७ मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, दीपक सावंत, रणजीत पाटील, बबनराव लोणीकर आणि चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांवर कारवाई करून जेलमध्ये टाकल्याशिवाय मी व काँग्रेस गप्प बसणार नाही. (प्रतिनिधी)...अन् पालिकेने हटविले १२०० झेंडे- धिक्कार मोर्चासाठी काँग्रेसने फॅशन स्ट्रिट ते आझाद मैदान परिसरात सुमारे १२०० काँगे्रसचे झेंडे लावले होते. रस्ता दुभाजक, फुटपाथवरील विजेचे खांब आदींवर झेंडे लावले गेले. मात्र, मोर्चा सुरू होण्याच्या आधीच महापालिका अधिकाऱ्यांनी हे झेंडे हटविण्याची कार्यवाही केली. त्यामुळे नाराज काँग्रेस कार्यकर्ते हेच झेंडे हातात घेत, मोर्च्यात सहभागी झाले. - काँग्रेसच्या मोर्चाला शिवसेना-भाजपा घाबरली आहे. त्यामुळेच पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत झेंडे हटविण्याचा प्रकार करण्यात आला. मात्र, या अशा प्रकारांनी काँग्रेस दबणार नाही, पालिकेच्या विरोधातील आमचा लढा सुरूच राहील, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.युतीवर आरोपमुंबई महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. नालेसफाई घोटाळा, टॅब घोटाळा, रस्ते बांधणी घोटाळा, खड्डे दुरुस्ती घोटाळा, डम्पिंग ग्राउंड घोटाळा असे अनेक घोटाळे झालेले आहेत. भाजपाचेच खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत माफिया राज सुरू असल्याचे म्हटले होते. माफिया राजला वांद्र्याचे एक साहेब त्यांचा मेहुणा व त्यांचाच खासगी सचिव जबाबदार असल्याचे ते म्हणाले होते. आता सोमय्या यांनी त्यांची नावे जाहीर करावीत व त्यांच्यावर कारवाई करून अटक करावी, अशी आमची मागणी आहे, शिवाय महापालिका चालविण्यात शिवसेना-भाजपा अपयशी ठरली असल्याने, महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली.