शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात स्वाइन फ्लूने घेतले १९७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 05:40 IST

जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १८ लाख ६५ हजार ७०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

मुंबई : राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरीही साथीच्या आजारांचा जोर कमी झालेला नाही. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी डेंग्यू, मलेरियामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, दुसरीकडे आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आॅगस्ट महिन्यापर्यंत राज्यभरात स्वाइन फ्लूचे १९७ बळी गेले असून, दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.


जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १८ लाख ६५ हजार ७०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती नव्या स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रभाव नाशिक, नागपूरमध्ये आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदनगरसारख्या शहरी भागांतही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले.नाशिकमध्ये स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक ३२ जण दगावले, तर नागपूर २६, पुण्यात १७, अहमदनगर १६, कोल्हापूर ९ आणि ठाण्यात ८ जणांचा मृत्यू झाला. नाशिक आणि नागपूरमध्ये आढळलेल्या २९ हजार ७०२ संशयित रुग्णांना आॅसेलटॅमिवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत.

‘आजार अंगावर काढू नयेत’
२०१७ मध्ये वर्षभरात ४२ हजार ४९२ जणांना लसीकरण करण्यात आले, तसेच २०१८ या वर्षात एक लाख २८ हजार जणांना तर जानेवारी ते आॅगस्ट २०१९ या कालावधीत ४७ हजार ६०६ जणांना लसीकरण करण्यात आले. स्वाइन फ्लूचा वाढता प्रभाव लक्षात घेता, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नागरिकांनीदेखील स्वत: काळजी घेत, सर्दी, ताप, घसादुखीसारखे आजार अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे राज्य संसर्गजन्य रोग विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू