मालवणात उद्या जलतरण स्पर्धा

By Admin | Updated: December 19, 2014 23:28 IST2014-12-19T22:57:31+5:302014-12-19T23:28:10+5:30

२६ जिल्ह्यामधील १२०० स्पर्धकांची नोंद

Swimming competition in Malwada tomorrow | मालवणात उद्या जलतरण स्पर्धा

मालवणात उद्या जलतरण स्पर्धा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने चिवला बीच मालवण येथे उद्या रविवारी जलतरण स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते होणार आहे.
२६ जिल्ह्यामधील १२०० स्पर्धकांची नोंद झाली आहे. ६ ते ८० या वयोगटातील स्पर्धकांचे ११ वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धकांमध्ये २५० महिला व ८८५ मुले व पुरूषांचा समावेश असणार आहे. जलतरण स्पर्धेत ३९ अपंग जलतरणपटू सहभागी होणार आहेत. हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. स्पर्धकांची नोंदणी २० डिसेंबर रोजी जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे होणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Swimming competition in Malwada tomorrow