शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागातील बदल्यांना स्थगिती

By admin | Updated: June 5, 2015 01:54 IST

गट ‘अ’ दर्जाच्या ३८९ अधिकाऱ्यांच्या बदल्या उपसचिव श्रीमती सी. एन. सूर्यवंशी यांनी सचिव, राज्यमंत्री आणि मंत्र्यांना अंधारात ठेवून करण्यात आल्याचे उघडकीस आले.

अतुल कुलकर्णी - मुंबई कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागातील गट ‘अ’ दर्जाच्या ३८९ अधिकाऱ्यांच्या बदल्या उपसचिव श्रीमती सी. एन. सूर्यवंशी यांनी सचिव, राज्यमंत्री आणि मंत्र्यांना अंधारात ठेवून करण्यात आल्याचे उघडकीस आले. शिवाय, एकाच अधिकाऱ्याच्या दोन-दोन ठिकाणी बदली आणि निवृतीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचे प्रतापही घडल्याने मोठा असंतोष निर्माण होताच सगळ्या बदल्या तातडीने स्थगित करण्यात आल्या आहेत.या प्र्रकरणी उपसचिव श्रीमती सूर्यवंशी यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’ला दिली. कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागातील ३८९ बदल्यांपैकी २०२ बदल्या प्रशासकीय कारणासाठी करण्यात आल्याचे बदली आदेशात नमूद केले असले तरी उर्वरित १८७ बदल्या विनंतीवरून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातही काही अधिकाऱ्यांच्या मते त्यांच्याकडून तुमच्या आवडीचे ठिकाण देतो असे सांगून विनंती अर्ज लिहून घेतले गेले; मात्र प्रत्यक्षात दुसऱ्याच ठिकाणी बदल्या केल्या गेल्या आहेत. याबद्दल पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त ए.टी. कुंभार यांना विचारले असता ते म्हणाले, शासनाकडे वर्ग १च्या बदल्या करताना काही चुका झाल्या आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, काहींचा कार्यकाळ चुकीचा मोजला गेला आहे, त्यामुळे सचिवांच्या आदेशानुसारच आपण बदल्यांचे आदेश थांबवले आहेत.सध्या बदलीइच्छुकांच्या गर्दीने मंत्रालय गच्च भरून गेले आहे. प्रत्येक मंत्र्याच्या दालनापुढे गर्दीच गर्दी असून, आमदारांच्या शिफारस पत्रांचा पाऊस पडत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या बदल्यांमध्ये तर ‘धर्मा’धिकार वापरून अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा आहे. याबाबत आयुक्त कुंभार म्हणाले, बदल्यांसाठी, शासकीय कामासाठी कोणी पैसे मागत असेल तर तुम्ही स्टिंग आॅपरेशन करून मला माहिती द्या, फोटो द्या असे आवाहन आम्ही केले आहे. कोणी तसे पुढे आले तर नक्की कारवाई करू. मात्र गट १च्या बदल्या मंत्रालय स्तरावर झालेल्या असल्यामुळे त्यावर मी बोलणे योग्य होणार नाही.या बदल्या आम्हाला कोणालाही न विचारता केल्या गेल्या आहेत. उपसचिव सूर्यवंशी बार्इंनी या बदल्या केल्या होत्या. त्यातल्या अनियमितता व गंभीर चुका लक्षात घेता दुरुस्तीचे आदेश दिले असून, सूर्यवंशी यांची बदली केली आहे. त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.- एकनाथ खडसे, पशुसंवर्धन मंत्री