शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांच्या सेवा ज्येष्ठतेच्या लाभांना स्थगिती

By admin | Updated: April 1, 2015 02:06 IST

राज्यातील नेट सेट परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या प्राध्यापकांची सेवा नियुक्ती दिनांकापासून गृहित धरावी तसेच त्यांना सेवा ज्येष्ठतेचे लाभ देण्यात यावेत,

पुणे : राज्यातील नेट सेट परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या प्राध्यापकांची सेवा नियुक्ती दिनांकापासून गृहित धरावी तसेच त्यांना सेवा ज्येष्ठतेचे लाभ देण्यात यावेत, या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.नेट- सेटमधून सूट मिळण्याच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे एकत्रित करावीत तसेच त्यासाठी एक स्वतंत्र खंडपीठ स्थापन करून त्यावर निकाल द्यावा,असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.नेट सेट परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या राज्यातील प्राध्यापकांची सेवा नियुक्ती दिनांकापासून गृहित धरून त्याचे लाभ मिळावेत यासाठी उच्च न्यायालयात काहींनी धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयाने नेट सेट परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या प्राध्यापकांच्या बाजूने निकाल दिला होता. संबंधित प्राध्यापकांची सेवा त्यांच्या नियुक्तीपासून गृहित धरून त्यांना दरवर्षी सहा टक्के प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, असा निर्णय दिला होता. परंतु,उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने २५ मार्च रोजी अंतिम निकाल दिला तसेच उच्च न्यायालयात स्वतंत्र खंडपीठासमोर या सर्व प्रकरणांची सुनावणी करावी, असे स्पष्ट केले.या सर्व प्रकरणांचा निकाल सहा महिन्यांत स्वतंत्र खंडपीठ स्थापन करून दिला जावा. त्यात या प्रकरणासंदर्भात कोणताही निर्णय दिलेल्या खंडपीठातील न्यायाधिशांचा समावेश करू नये. नेट सेट बाबतच्या अद्याप प्रकाशात न आलेल्या विविध बाजू समजावून घ्याव्यात. तसेच राज्य शासनाने या प्रकरणाची सुनावणी नव्याने होणार असल्याचे सूचित करावे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. (प्रतिनिधी)