यवतमाळच्या 18 शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करून कृषी आयुक्तांना तातडीने निलंबित करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 06:45 PM2017-10-03T18:45:36+5:302017-10-03T18:48:14+5:30

यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा होऊन १८ शेतकऱ्यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Suspend agriculture commissioners by establishing 'SIT' on the death of 18 Yavatmal farmers! | यवतमाळच्या 18 शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करून कृषी आयुक्तांना तातडीने निलंबित करा!

यवतमाळच्या 18 शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करून कृषी आयुक्तांना तातडीने निलंबित करा!

Next

मुंबई- यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा होऊन १८ शेतकऱ्यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

विखे पाटील यांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन सोपवले. या गंभीर प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्यामुळे राज्याचे कृषी आयुक्त,विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने निलंबीत करावे. त्यासोबतच संबंधित औषध कंपन्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे आणि पीडित शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तात्काळ भरीव आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

आपल्या पत्रामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले आहे की, यवतमाळ जिल्ह्यात कापूस, तूर आणि सोयाबीन आदी पिकांवरील किड नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करताना हे प्रकार घडले आहेत. मात्र कृषी विभागाने अद्याप या घटना गांभिर्याने घेतलेल्या नाहीत. फवारणीतून विषबाधा झाल्याची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात आली नाही. तब्बल १८ शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्यानंतरही राज्याच्या कृषी आयुक्तांनी तातडीने यवतमाळचा दौरा केला नाही. कृषी आणि आरोग्य विभागाने फवारणी करताना नेमकी कशा पद्धतीने दक्षता घेतली पाहिजे,याबाबत जनजागृती केलेली नाही. दुसरीकडे औषध कंपन्या मात्र ही शेतकऱ्यांची चूक असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकू पाहत आहेत, असाही ठपका विरोधी पक्षनेत्यांनी ठेवला आहे.
 

Web Title: Suspend agriculture commissioners by establishing 'SIT' on the death of 18 Yavatmal farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.