शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणा-याला अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 9:18 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अश्लिल भाषा वापरणाऱ्याला अटक

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात सोशल मिडियावर अत्यंत घाणेरड्या भाषेत मजकूर लिहिणा-या आरोपीला नंदनवन पोलिसांनी मंगळवारी अटक केली. वालचंद्र गिट्टे असे आरोपीचे नाव असून तो, एका खासगी कंपनीत कामाला आहे. तो सुरेंद्रनगरात राहतो.१५ नोव्हेंबरच्या रात्री ११.३१ ते ११.५० या वेळेत आरोपी वालचंद्र गिट्टे याने आपल्या व्टिटरवर राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया शिंदे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह्य व्टिट केले. दुस-या दिवशी ते लक्षात आल्यानंतर राष्टवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव जगदीश पंचबुद्धे आणि नागपूर राष्टवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल कामळे यांनी प्रारंभी गुन्हेशाखेत आणि नंतर नंदनवन ठाण्यात धाव घेतली. प्रदीर्घ मंथनानंतर नंदनवन पोलिसांनी १६ नोव्हेंबरच्या रात्री भादंविचे कलम ५०० व ५०९ तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरण हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिसांनी या संबंधाने बरीच गुप्तता पाळत चौकशी चालवली. त्यानंतर आज सकाळी आरोपी वालचंद्र गिट्टे याचा पत्ता शोधून त्याच्या मुसक्या बांधल्या. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याला अटक केल्याचे नंदनवनमधील काही कर्मचारी सायंकाळी सांगत होते. तर, रात्री ९ वाजेपर्यंत त्याला अटक झाली नसल्याचे पोलीस ठाण्यातून काही कर्मचारी सांगत होते. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसArrestअटकCrimeगुन्हाnagpurनागपूर