शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

sushant death case : रिया चक्रवर्ती, तिच्या भावाला केव्हाही होऊ शकते अटक, ड्रग पेडलरशी थेट संबंध असल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 9:42 PM

एनसीबीने सोमवारी मुंबईत दोन जणांना अटक केली. या दोघाची चौकशी केली असता, त्यांचे रिया आणि तिच्या भावाशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सोमवारी एक मोठी गोष्ट समोर आली.नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोदेखील या प्रकरणाचा अत्यंत गाभीर्याने तपास करत आहे.एनसीबीने सोमवारी मुंबईत दोन जणांना अटक केली.

मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सोमवारी एक मोठी गोष्ट समोर आली. या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यापासूनच रिया आणि तिच्या भावावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तसेच, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोदेखील या प्रकरणाचा अत्यंत गाभीर्याने तपास करत आहे. एनसीबीने सोमवारी मुंबईत दोन जणांना अटक केली. या दोघाची चौकशी केली असता, त्यांचे रिया आणि तिच्या भावाशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे.

रियाला जामीन मिळू नये यासाठी, एनसीबी रियाविरोधात आणखी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीशी संबंधित लोकांनी म्हटले आहे, की टीमने ज्या आरोपीला अटक केली आहे, त्याच्या सोबत रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे रिया आणि तिच्या भावालाही तत्काळ अटक केली जाऊ शकते. 

बॉलीवुडमधील अनेक नामवंत चेहऱ्यांचा ड्रग पेडलरशी सबंध -अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर्सच्या चौकशीतून रिया आणि तिच्या भावा शिवाय, बॉलीवुडमधील अनेक मोठ्या लोकांची नावे समोर आली आहेत. एनसीबी लवकरच ही नावेही जाहीर करण्याची शक्यता आहे. संबंधित वृत्तानुसार, वांद्रे, जुहू आणि लोखंडवाला भागांत होणाऱ्या बॉलिवुड पार्टीजमध्ये ड्रग्‍स घेतले जाते, असे ड्रग पेडलर्सनी सांगितले. रियावरही ड्रग्सचा वापर करणे आणि डीलिंग' करण्याचा आरोप आहे.

सीबीआयकडून रियाचीही चौकशी सुरूच -सीबीआयकडून रियाची चौकशी सातत्याने सुरूच आहे. सीबीआयच्या पथकाने रविवारी जवळपास नऊ तास तिची चौकशी केली, यापूर्वी शनिवारी सात तास चौकशी चालली. तर शुक्रवारीही जवळपास दहा तास तिची चौकशी सुरू होती. आता सीबीआय गुरुवारपासून रियाचा भाऊ शौविकची चोकशी करणार आहे. तत्पूर्वी मुंबई पोलिसांनीही रियाची चोकशी केली होती. याशिवाय अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) अभिनेत्री रियाची चौकशी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या -

IndiaChinaTension : NSA अजीत डोवाल अ‍ॅक्शन मोडमध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक 

 ...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती

प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंचत्वात विलीन

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीMumbaiमुंबईPoliceपोलिस