चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 05:36 PM2020-09-01T17:36:40+5:302020-09-01T17:43:14+5:30

अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री स्टिफेन बिगन सोमवारी म्हणाले,  य चारही देशांची बैठक लवकरच दिल्लीत होण्याची आशा आहे. या बैठकीत या प्रस्तावित संघटनेसंदर्भात आणि सैन्य सहकार्यासंदर्भात चर्चा होईल.

stephen biegun says America aiming for nato like alliance with india australia and japan to counter china | चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

Next
ठळक मुद्देभारत (India), जपान आणि ऑस्ट्रेलियाला सोबत घेऊन नाटो सारखीच एक संघटना तयार करण्याची अमेरिकेची इच्छा आहे.या चारही देशांची बैठक लवकरच दिल्लीत होण्याची आशा आहे.या बैठकीत या प्रस्तावित संघटनेसंदर्भात आणि सैन्य सहकार्यासंदर्भात चर्चा होईल.

वॉशिंग्टन - दक्षिण आशिया आणि दक्षीण चीन समुद्रात (South China Sea) चीनच्या वाढत्या दादागीरीला लगाम घालण्यासाठी अमेरिकेने आता मास्टर प्लॅन तयार केला आहे. इंडो-पॅसिफिक भागातील आपले सहकारी, असलेल्या भारत (India), जपान आणि ऑस्ट्रेलियाला सोबत घेऊन नाटो सारखीच एक संघटना तयार करण्याची अमेरिकेची इच्छा आहे. चीनला लगाम घालण्यासाठी नार्थ अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) सारखीच एक संघटना या भागातही असणे अत्यंत आवश्यक आहे, असे अमेरिकेला वाटते.

अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री स्टिफेन बिगन सोमवारी म्हणाले,  या चारही देशांची बैठक लवकरच दिल्लीत होण्याची आशा आहे. या बैठकीत या प्रस्तावित संघटनेसंदर्भात आणि सैन्य सहकार्यासंदर्भात चर्चा होईल. बिगन यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये म्हणाले, अमेरिकेचे लक्ष्य या चार देशांसोबत इतर देशांना एकत्र आणून चिनी आव्हानाचा सामना करणे आहे. बिगन यांनी भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत राहिलेल्या रिचर्ड वर्मा यांच्याशी ऑनलाईन चर्चेत भाग घेतला होता.

नाटो सारख्या संघटनेची आवश्यकता -
बिगन म्हणाले, इंडो-पॅसिफिक भागात शक्तीशाली स्ट्रक्चरची कमतरता आहे. त्यांच्याकडे नाटो अथवा यूरोपीय यूनियन (ईयू) सारखे शक्तीशाली संघटन नाही. जेव्हा नाटोची सुरुवात झाली, तेव्हा अनेक देशांनी नाटोचे सदस्य होण्याऐवजी तटस्थ राहणे पसंत केले होते. अशा प्रकारचे संघटन होण्यासाठी इतर देश अमेरिके प्रमाणे वचनबद्ध असायला हवे. मलाबार नेव्हल एक्सरसाईजमध्ये ऑस्ट्रेलियाने सहभाग घेणे, हे डिफेन्स ब्लॉक तयार करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असेही बिगन यांनी म्हटले आहे.

दक्षीण चायना मॉर्निंग पोस्टनुसार, मलाबार नेव्हल एक्सरसाईजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सहभागासंदर्भात भारत स्पष्ट संकेत देत आहे. बिगन म्हणाले, क्वाड्रीलेटरल सिक्योरिटी डायलॉग (क्वाड) देशांत व्हिएतनाम, दक्षीण कोरिया आणि न्युझीलंडलाही सहभागी करायल हवे. यात आता भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेचा समावेश आहे. याचा हेतू इंडो-पॅसिफिक भागात शांतता प्रस्थापित करणे असा आहे. 

मलाबार नेव्हल एक्सरसाइज म्हणजे काय?
अमेरिका आणि भारत यांच्यात 1992 पासून मलाबार नेव्हल एक्सरसाईज होते. ही एक्सरसाईज अधिकांश बंगालच्या खाडीत होत असते. 2015 पासून यात जपानचाही सहभाग आहे. एकदा 2007 मध्ये ऑस्ट्रेलियानेही यात सहभाग घेतला होता. मात्र, चीनने व्यापार कमी करण्याची धमकी दिल्यानंतर ऑस्ट्रेलिया यापासून दूर झाला. 2007 मध्ये सिंगापूरनेही यात सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने यावेळी पुन्हा या एक्सरसाईजमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंचत्वात विलीन

डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

Web Title: stephen biegun says America aiming for nato like alliance with india australia and japan to counter china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.