लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 07:21 PM2020-09-01T19:21:46+5:302020-09-01T19:26:46+5:30

जनतेचे लक्ष गरीबी आणि उपासमारीवरून हटवून देशभक्ती आणि राष्ट्रवादावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न चिनी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

china food crisis behind ladakh india china face off tension was similar in 1962 also | लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती

लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती

Next
ठळक मुद्देचीनमध्ये यावेळीही 1962 सारखीच उपास मारवाद उत्पन्न करून उपासमार लपवतायत जिनपिंगनाकतोडे, पूर आणि कोरोनामुळे चीन बेहाल

पेइचिंग - लडाखमधील पेंगाँग भागात भारताला खेटत असलेला चीन आज दाण्या-दाण्यासाठी तरसत आहे. जेव्हा चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ऑगस्ट महिन्यात क्लीन युअर प्लेट अभियानाला सुरुवात केली होती, तेव्हाच हे दिसून आले होते. आज खाण्याच्या समस्येचा सामना करत असलेला चीनभारताला खेटून जहाल राष्ट्रवादाचा आधार घेत आहे. एवढेच नाही, तर दक्षिण चीन समुद्रात एप्रिल ते ऑगस्टपर्यंत चीनने किमान पाच वेळा लाइव्ह फायर ड्रिलही केली. जनतेचे लक्ष गरीबी आणि उपासमारीवरून हटवून देशभक्ती आणि राष्ट्रवादावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न चिनी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

चीनमध्ये यावेळीही 1962 सारखीच उपास मार -
उपासमारीकडे चिनी जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठी चीन भारतासोबत सीमा प्रश्न वाढवत आहे. मात्र हे पहिल्यांदाच होत आहे, असे नाही. 1962 मध्येही चीनमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हाही चीनचे सर्वोच्च नेते माओत्से तुंग यांनी भारतासोबत युद्ध छेडले होते. त्यावेळी चीनमध्ये हजारो लोकांचा उपासमारीने मृत्यू झाला होता. याच मुद्द्यावून तत्कालीन शासनाविरोधात ग्रेट लीप फॉरवर्ड मूव्हमेंटदेखील चालली होती. यावेळीही, चिनी वुल्फ वॉरियर म्हणवले जाणारे राजदूत आणि चिनी पिपल्स लिबरेशन आर्मीदेखील अगदी तसेच करत आहे.

वाद उत्पन्न करून उपासमार लपवतायत जिनपिंग - 
कोरोना व्हायरसमुळे चीनमधील अन्नधान्यांचे संकट वाढत आहे. ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी खाद्य सुरक्षेच्या दृष्टीने 2013 चे क्लीन युअर प्लेट अभियान पुन्हा सुरू केले आहे. पश्चिमेकडील माध्यमांनीही म्हटले आहे, की या योजनेच्या आडून चिनी प्रशासन देशातील खाद्यांन्नाची समस्या लपवत आहे.

नाकतोडे, पूर आणि कोरोनामुळे चीन बेहाल -
सध्या चीन दशकातील सर्वात मोठ्या नाकतोड्यांच्या हल्ल्याने परेशाण आहे. यामुळे चीनच्या दक्षिण भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिनी सैन्यदेखील प्रयत्न करत आहे. दक्षिणेकडील भागात महापुरांमुळे चीनमधील हजारो एकर पिकांचे नुकसान झाले आहे. महत्वाचे म्हणजे, चीनच्या ज्या भागात सर्वाधिक पीक घेतले जात होते, त्याच भागाला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. 

चीनमध्ये सातत्याने वाढतेय खाद्यांनांची आयात -
चीनमधील सामान्य प्रशासन विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जानेवारी ते जुलैदरम्यान चीनची धान्य आयात 22.7 टक्क्यांनी (74.51 मिलियन टन) वाढली आहे. चीनमध्ये दर वर्षी गव्हाच्या आयातीत 197 टक्क्यांची वाढ दुसून आली. एवढेच नाही, तर जुलै महिन्यातील मक्काच्या आयातीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे, चीनमध्ये मुबलक प्रमाणात धान्य असेल, तर त्यांना आयात का वाढवावी लागत आहे, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, चीन विक्रमी पीक आल्याचा आणि देशात अन्न-धान्याची करमतरता नसल्याचा दावा करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंचत्वात विलीन

डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

Web Title: china food crisis behind ladakh india china face off tension was similar in 1962 also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.