शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळांमध्ये सुर्यनमस्काराची सक्ती

By admin | Updated: August 23, 2016 21:49 IST

स्फूर्ती निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये सुर्यनमस्कार सक्तीचा करण्याची ठरावाची सुचना पालिकेच्या महासभेत आज बहुमताने मंजूर करण्यात आली़

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ : विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये सुर्यनमस्कार सक्तीचा करण्याची ठरावाची सुचना पालिकेच्या महासभेत आज बहुमताने मंजूर करण्यात आली़ समाजवादी पक्षाने या सुचनेला आव्हान देत उर्दू शाळांमध्ये सलाम वालेकुम बोलू, असे ठणकावले़ सर्वच विरोधी पक्ष भाजपाविरोधात उभे ठाकले़ मात्र या वादळी चर्चेवेळी बघ्याच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेने मतदानावेळी युती धर्म पाळला़  पालिकेच्या शाळांमध्ये रोज सकाळी प्रार्थनेवेळी योगा व त्यात विशेषत सुर्यनमस्कार सक्तीचा करावा, अशी ठरावाची सुचना भाजपाच्या नगरसेविका समिता कांबळे यांनी ठेवली होती़ मात्र या सुचनेविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजवादी पक्षाने सर्वच विरोधी पक्षांना साकडे घातले होते़ युतीमधील दुफळीचा लाभ उठविण्यासाठी शिवसेनेलाही यात सामील होण्याचे आवाहन समाजवादी पक्षाने केले होते़.

त्यानुसार विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी पालिका शाळांमध्ये सुर्यनमस्कार ऐच्छिक असावा, अशी उपसुचना मांडली़ या उपसुचनेला मनसे आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला़ समाजवादी पक्षाने मात्र सुर्यनमस्कार नकोच, अशी भूमिका घेतली़ सुर्यनमस्कार सक्तीचा केल्यास आम्ही उर्दू शाळांमध्ये सलाम वालेकुम सुरु करु, असा इशारा दिला़ मात्र भाजपाने यावर मतदान घेतले़ यात शिवसेनेने मित्रपक्षालाच साथ दिल्यामुळे ही सुचना मंजूर झाली़  १७७ देशांमधील शाळांमध्ये योगा सक्तीचे आहे़ यापैकी ४७ हे मुस्मिल धर्मिय देश आहेत़

भाजपाचा दावा़पालिका शाळांमध्ये सुर्यनमस्कार ऐच्छिक असावा, ज्या विद्यार्थ्यांना सुर्यनमस्कार करायचा असेल, ते करतील़ विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तक अशा सुविधा वेळेत मिळतात का, यावर चर्चा करावी़काँग्रेसची भूमिका़विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा- पालिका शाळांमध्ये सुर्यनमस्कार सक्तीचा केल्यास उर्दू शाळांमध्ये सलाम वालेकुम आणि मुस्लिम धर्मिय प्रार्थना सुरु करु़समाजवादीचे गटनेते रईस शेख- सुर्यनमस्काराचा निर्णय मुलांवर थोपू नका़ ऐच्छिक करावा़ मनसे गटनेते संदीप देशपांडेशिवसेनेने पाळला युती धर्मशिवसेनेचे महत्वकांक्षी प्रकल्पाला भाजपाने सुरुंग लावायचा आणि भाजपाची स्वप्न शिवसेनेने भंग करायची, असा खेळ गेले वर्षभर सुरु आहे़ या ठरावाच्या सुचनेबाबतही शिवसेनेने ठोस भूमिका घेतली नव्हती़ मात्र मतदानावेळी शिवसेनेने भाजपाच्या बाजुने कौल दिला़ त्यामुळे ही ठरावाची सुचना मंजूर झाली आहे़ ही सुचना पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येईल़ त्यानंतर आयुक्त ही सुचना राज्य सरकारकडे पाठवतील़ मात्र सत्ता भाजपाची असल्याने त्यावर शिक्कामोतर्ब होण्याची दाट शक्यता आहे़विरोधी पक्षांचा सभात्यागभाजपाच्या या मनमानी कारभाराला विरोध करीत विरोधी पक्षांनी अखेर मतदानानंतर सभात्याग केला़पालिकेच्या ११०० शाळा असून यामध्ये सुमारे चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़