सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही भाजपाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान, दिलं सहकोषाध्यक्षपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:59 IST2026-02-24T12:58:40+5:302026-02-24T12:59:27+5:30

BJP State Executive News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी यांनाही भाजपाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

Supriya Sule's upcoming Relative Arun Lakhani also gets a place in the new BJP executive, given the post of co-treasurer | सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही भाजपाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान, दिलं सहकोषाध्यक्षपद

सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही भाजपाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान, दिलं सहकोषाध्यक्षपद

केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाने आज आपल्या महाराष्ट्रातील नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी यांनाही भाजपाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. अरुण लखानी यांची पक्षाच्या सहकोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी टाकली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीत बढती दिली असून, यापुढे भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर अरुण लखानी यांची सहकोषाध्यक्षपदी निवड करण्याता आली आहे. 

दरम्यान, अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही असून, सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि अरुन  लखानी यांचा पुत्र सारंग लखानी यांचा विवाह निश्चित झाल्याची घोषणा हल्लीच झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुळे आणि लखानी कुटुंबीयांमधील ही सोयरिक जुळली होती.

Web Title : सुप्रिया सुले के होने वाले रिश्तेदार को भाजपा की नई कार्यकारिणी में पद।

Web Summary : भाजपा ने अपनी नई महाराष्ट्र कार्यकारिणी की घोषणा की, जिसमें नए चेहरों को महत्वपूर्ण पद दिए गए। सुप्रिया सुले के होने वाले रिश्तेदार, अरुण लखानी को पार्टी का सह-कोषाध्यक्ष नियुक्त किया गया। यह घोषणा भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण ने की। लखानी के बेटे की शादी सुले की बेटी से हो रही है।

Web Title : Supriya Sule's future relative gets position in BJP's new committee.

Web Summary : BJP announced its new Maharashtra committee, giving key positions to fresh faces. Supriya Sule's future relative, Arun Lakhani, was appointed as the party's co-treasurer. The announcement was made by BJP state president Ravindra Chavan. Lakhani's son is marrying Sule's daughter.