"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:07 IST2025-05-22T17:04:50+5:302025-05-22T17:07:31+5:30
Sanjay Shirsat Sharad Pawar: कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या असल्याची भविष्यवाणी केली.

"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
Maharashtra Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांच्या विधानाचा धागा पकडत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत दिले. 'राजकारणात काहीही अशक्य नाही. मला वाटतं भविष्यात शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील', असं मोठं भाकित संजय शिरसाट यांनी केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका वृत्तवाहिनीशी बोलताना कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची आधीपासूनची इच्छा आहे. त्या मंत्री दिसू शकतात, हे नाकारता येत नाही, असेही शिरसाट म्हणाले.
वाचा >>असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
मानसन्मान मिळाला तर महाविकास आघाडी म्हणून लढू, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढू, असे विधान आमदार रोहित पवारांनी केलं होतं. याबद्दल शिरसाटांना विचारण्यात आले.
'रोहित पवारांचे आजोबा दुसरा मार्ग पत्करताहेत'
कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "मानसन्मानाचा प्रश्न आता येतो कुठे? रोहित पवारांना माहिती आहे की, आपल्याला महाविकास आघाडीबरोबर राहायचंच नाही. त्यांचे आजोबा दुसरा मार्ग पत्करताहेत. काका आधीच दुसरीकडे गेले आहेत. सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाखाली परदेशात गेलेल्या आहेत."
शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील -संजय शिरसाट
"आता महाविकास आघाडीबरोबर राहणे, हे त्यांना पचनी पडणार नाहीये आणि ते राहणार पण नाहीत. येणारे राजकारण तुम्हाला वेगळ्या धाटणीचे तुम्हाला पाहायला मिळेल. मला वाटतं भविष्यात शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील", असे मोठे भाकित संजय शिरसाट यांनी केले.
थोडक्यात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री दिसतील का? असा प्रश्न त्यांना उत्तरानंतर विचारण्यात आला. शिरसाट म्हणाले, "नाकारता येत नाही. राजकारणात काहीही अशक्य नाही. सुप्रिया सुळेंची तशी तीव्र इच्छा पहिल्यापासून होती. जर ती पूर्ण होत असेल, तर मला वाटतं तडजोड करायला काही हरकत नाही", असे विधान संजय शिरसाट यांनी केले.
संजय शिरसाट पुढे असेही म्हणाले की, 'शरद पवार या महिन्याच्या अखेरीपर्यंत महायुतीत सामील होणार नाहीत. पुढच्या महिन्यात १५ तारखेपर्यंत उलाढाल होतील, असे एकंदरीत राजकीय वर्तुळातून कळतंय. ती माहिती खरी की खोटी माहिती नाही. पण, आता लवकरच एकत्र येतील", सांगत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याचे संकेत दिले.