शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, २५ जानेवारीला पुढील सुनावणी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 07:31 IST

Maratha reservation : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी विविध उदाहरणे देऊन स्थगिती हटविण्याची विनंती केली. मात्र त्यास न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला. आता पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होणार आहे.सरकारी भरतीवर बंधने नाहीत. परंतु या कायद्यांतर्गत ती करता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. सरकारची बाजू मुकुल रोहतगी यांनी मांडली. याबाबत युक्तिवाद करताना रोहतगी म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही. स्वतंत्र ईएसबीसी श्रेणी तयार करण्यात आली. या श्रेणीत येणाऱ्यांना नोकरी, शिक्षणात आरक्षण देण्यात आले. 

सरसकट नाेकरभरती करण्यास मनाई नाही स्थगिती न हटल्यास २ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होईल. मात्र केवळ याच श्रेणीतील आरक्षणावर स्थगिती आहे, सरसकट भरतीस मनाई नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.  दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने नोकरी व शिक्षणात आरक्षण देताना एसईबीसी अधिनियम मंजूर केला होता. आरक्षण घटनाबाह्य असल्याचे सांगून २७ जून २०१९ रोजी त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. 

अन्य पर्यायांचा अवलंब करावा न्यायालयीन लढताना एक वेगळी रणनीती लागते, जिचा अभाव राज्य सरकारकडे दिसून आला. अजूनही वेळ गेलेली नाही. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासनाकडे अनेक पर्याय आहेत, त्यांचा विशेष बाब म्हणून सरकारने अवलंब करावा ही विनंती. तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व सर्वच सत्ताधारी व विरोधी पक्षांनी मराठा आरक्षण प्रकरण गांभीर्याने घ्यावे ! समाजाचा न्यायप्रकियेवर पूर्णतः विश्वास आहे. आम्ही पुन्हा कोर्टात नवीन अर्ज करू.     - विनोद पाटील, याचिकाकर्ते काय करायचे ते सरकारनेच सांगावेतरुणांचे फार नुकसान होतेय. त्यांच्यात आक्रोश निर्माण होतोय. त्यांना पुढे काय करायचं कळत नाहीये. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल, याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी मी विनंती करतो. हा न्यायप्रविष्ट विषय आहे. २५ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय होईल किंवा अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल, पण तोपर्यंत सरकार या मुलांसाठी काय करणार आहे. काय मदत देणार आहे, हे सरकारनं सांगावे.     - संभाजीराजे, खासदार मुकुल रोहतगी, पीएस पटवालिया, कपिल सिब्बल यांनी राज्य सरकारच्या वतीने तर अभिषेक मनु सिंघवी आणि संदीप देशमुख यांनी याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने बाजू मांडली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार