शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातल्या कैद्यांच्या सुरक्षेसाठी उच्चस्तरीय समिती सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 13:45 IST

राज्यात एकूण ४५ ठिकाणी ६० कारागृह आहे. त्यात ३८००० कैदी आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातल्या कैद्यांबाबतचे प्रतिज्ञापत्र नुकतेच सर्वोच्च न्यायालयाला सादर सर्व राज्यांना कैद्यांच्या शिक्षेच्या माहितीचा अहवाल पाठविण्याचे आदेश

युगंधर ताजणे -पुणे : कलम २१ नुसार प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तसाच तो अधिकार कैद्यांनादेखील आहे. कैद्यांच्या सुरक्षा आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रेडक्रॉस सोसायटी आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून कैद्यांच्या सुरक्षेसाठी ' हाय पावर कमिटी' स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्याचे तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी महाराष्ट्रातल्या कैद्यांबाबतचे प्रतिज्ञापत्र नुकतेच सर्वोच्च न्यायालयाला सादर केले आहे. 

राज्यात एकूण ४५ ठिकाणी ६० कारागृह आहे . त्यात ३८००० कैदी आहेत. त्यातील दोन तृतीयांश कच्चे कैदी आहे. हि सुविधा सात वर्षांच्या आतील शिक्षा ठोठावलेल्या कैद्यानाच यांचा लाभ मिळणार आहे. यात कच्च्या कैद्यांचा देखील सहभाग आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुभार्वाने संपूर्ण देश एका वेगळ्या संकटातून जात आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र, राज्य प्रशासनाकडून शथीर्चे प्रयत्न सुरू आहेत. अशातच तुरुंगातल्या कैद्यांच्या सुरक्षेचे काय? याविषयी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना देशातील सर्व राज्यांना कैद्यांच्या शिक्षेच्या माहितीचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. यात महाराष्ट्राच्यावतीने रामानंद यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र गुजरात, मणिपूर, ओडिशा, दादरा नगर हवेली, पाँडेचरी यापैकी कु ठल्याच राज्याने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याबद्दल न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विधी संघर्षित  कैद्यांविषयी कुठलीच माहिती नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे या हाय पावर कमिटीमध्ये राज्य विधी सेवा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष, राज्याचे तुरुंग महानिरीक्षक, गृह विभागाचे सेक्रेटरी यांचा समावेश करण्यात आला आहे. यापुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्या कैद्यांना अंतरिम जामीन मिळावा, तसेच पॅरोलवर सुटी मिळावी, याचा निर्णय होणार आहे.  --------------* प्रतिज्ञापत्रात काय?-कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी कैद्यांकरिता स्वच्छताविषयक कुठल्या प्रकारच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत, त्यांना मास्कचे वाटप केले का, त्यांच्यावर सुरक्षेच्यादृष्टीने कुठले निर्बंध आदी माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणे गरजेचे होते. -बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, झारखंड, गोवा, केरळ आणि तेलंगणा याबरोबरच जम्मू-काश्मीर या राज्यांमधील तुरुंग प्रशासनाने डिजिटल थर्मामीटरचा उपक्रम सुरू केला असून तो स्तुत्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आंध्र प्रदेश, पंजाब, केंद्रशासित प्रदेश लडाख यांनी कैद्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी विशेष गट तयार केले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेjailतुरुंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस