औरंगाबाद : घरासमोर खेळत असलेल्या एका चिमुकलीचे अपहरण करून तिला सहा दिवस डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. अंधश्रद्धेतून तिला चटके दिल्याची शक्यता असून, तिच्या अंगावर चटक्यांचे व्रण आढळले आहेत.निशा सचिन साळवे (९ रा. इंदिरानगर, गारखेडा) ही ६ सप्टेंबरला घरासमोर खेळत होती. नंतर ती आजीकडे एकटीच प्रगती कॉलनीकडे पायी निघाली. सूतगिरणी, दर्गा चौकातून ती उस्मानपुरा परिसरात पोहोचली. तेथे तिने एका आजीला घाटी कुठे आहे, असे विचारले. आजीने माझे नातेवाईक तुला सोडतील, असे सांगितले. दोघांनी तिला सोबत नेले. मात्र, त्यांनी तिला दुसरीकडेच नेले. निशा घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याबाबत जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहाव्या दिवशी ११ सप्टेंबरला रात्री अपहरणकर्त्यांनी तिला ३० रुपये देऊन घाटीजवळ सोडून दिले. नंतर ती तेथून आजीकडे गेली. ‘घाटी परिसरात सोडण्याच्या बहाण्याने शटर असलेल्या एका गाडीतून दोघांनी मला एका ठिकाणी नेले, तेथे खोलीत डांबून ठेवले. तेथे एक बाई आणि एक पुरुष होता. त्याशिवाय आणखी दोन लहान मुली आणि एक लहान मुलगा होता,’ असे निशाने सांगितले. ‘मला खाण्यासाठी वडापाव देत होते. त्यात काहीतरी औषध टाकत होते,’ असेही निशाने सांगितले. ‘वडापाव खाल्ला नाही, उलटी केली तर पंख्याला लटकवीन,’ अशी धमकी दिल्याचेही तिने सांगितले. (प्रतिनिधी)
अंधश्रद्धेतून चिमुकलीला चटके?
By admin | Updated: September 14, 2016 06:39 IST
घरासमोर खेळत असलेल्या एका चिमुकलीचे अपहरण करून तिला सहा दिवस डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे
अंधश्रद्धेतून चिमुकलीला चटके?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}