शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“आम्ही पहिल्या दिवसापासून...”; अजितदादांच्या विमान अपघात चौकशीवर सुनील तटकरे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:12 IST

Sunil Tatkare News: दादांच्या निधनाने फक्त महाराष्ट्रच नाही, देश दु:खात आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.

Sunil Tatkare News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला एक महिना पूर्ण झाला. अद्यापही संपूर्ण महाराष्ट्र अजित पवार यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करताना दिसत आहे. या महिन्याभरात अनेक घडामोडी घडल्या. रोहित पवारांनी या विमान अपघातावर शंका व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपद आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत राजकारणात सक्रीय सहभाग नोंदवला. या अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी सविस्तर भाष्य केले. 

अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाच्या या घटनेला महिना उलटल्यानंतर जय पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे हे सर्वजण विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ज्या ठिकाणी अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर सुनील तटकरेंनी म्हटले की, दादांना जाऊन एक महिना झाला. त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो. आमची सुरुवातीपासून मागणी आहे. सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांनी सखोल तपास करावा. सगळ्या बाजूने तपास करावा. दादांचे निधन झाले त्यावेळी वाहिनींना जबाबदारी द्यावी, अशी भूमिका आम्ही घेतली. दादांनंतर वहिनींनी जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली. त्यांनी जबाबदारी स्वीकारली, त्याचे ऋण आम्ही व्यक्त करतो, असे तटकरे यांनी म्हटले आहे. 

पहिल्या दिवशी त्या खात्याच्या केंद्रीय मंत्री महोदयानी चौकशी केली

सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे की, अशा प्रकारचे विमान अपघात घडतात त्यावेळी स्वायत्त तपास यंत्रणा भारत सरकारने स्थापन केलेली आहे. पहिल्या दिवशी त्या खात्याच्या केंद्रीय मंत्री महोदयानी चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी सीआयाडी चौकशीचे आदेश दिले. तशी चौकशी सुरू झाल्याची माहिती देण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. पक्षाच्या वतीने निवेदन दिले की, या सर्व घटनेची सीबीआय चौकशी केली जावी. दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्र व्यवहार केला, असेही तटकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, वेगवेगळ्या व्यक्तींनी या घटनेबाबत काही प्रश्न निर्माण केले. काहींनी त्यांचे मत व्यक्त केले. राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी आणि वरिष्ठ सहकाऱ्यांची भूमिका राहिली आहे की, यंत्रणेमार्फत तपास होत असताना ज्या बाबी उपस्थित झाल्यात, त्या बाबींसह सखोल तपास व्हावा. जागतिक स्तरावरील अशा अपघाताची चौकशी करण्यासाठी संस्था आहेत. त्यांची मदत घेतली जावी. दादांच्या निधनाने फक्त महाराष्ट्रच नाही, देश दु:खात आहे. प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. हा सर्व अहवाल महाराष्ट्रासह देशातील जनतेसमोर यावा अशी मागणी आहे, असेही तटकरे म्हणाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : From day one: Sunil Tatkare speaks on Ajit Pawar's plane crash probe.

Web Summary : Sunil Tatkare calls for thorough CBI probe into Ajit Pawar's plane crash, following concerns raised about the incident. He emphasizes transparency and global standards in the investigation, after Sunetra Pawar assumed responsibilities.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटनाsunil tatkareसुनील तटकरे