राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरेंची निवड

By Admin | Updated: June 25, 2014 14:18 IST2014-06-25T13:00:01+5:302014-06-25T14:18:40+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे.

Sunil Tatkare elected NCP state president | राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरेंची निवड

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरेंची निवड

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २५ - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मावळते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, मधुकर पिचड यांनी अनुमोदन दिले व सुनील तटकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आदी सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आल्यामुळे भास्कर जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Sunil Tatkare elected NCP state president