शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 00:15 IST

नागपूर (पारशिवनी): काँग्रेस नेते सुनील केदार यांना राजेंद्र मुळक यांचा कळवळा होता तर त्यांनी सावनेर येथून आपल्या पत्नीऐवजी मुळकांना ...

नागपूर (पारशिवनी): काँग्रेस नेते सुनील केदार यांना राजेंद्र मुळक यांचा कळवळा होता तर त्यांनी सावनेर येथून आपल्या पत्नीऐवजी मुळकांना तिकीट द्यायला हवे होते. कामठी येथून लढवायला हवे होते. केदारांच्या पोटात कपट आहे. त्यांनी महाविकास आघाडीशी विश्वासघात केला, अशी टीका उद्धवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी केली.

पारशिवनी येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. मुळकांना उतरविल्यावरून ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये विदर्भात तणावाचे वातावरण आहे. याचे पडसाद उमटत आहेत. व्यासपीठावर उद्धवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, शिवसेना कधीही पाठीमागून वार करीत नाही. कळमेश्वर येथील सभेत आम्ही महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकून आणू, अशी शपथ केदार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेतली होती. ती शपथ केदार विसरले. आम्ही लोकसभेत रामटेकची जागा मोठ्या मनाने काँग्रेसला दिली. श्यामकुमार बर्वे यांना निवडून आणले; परंतु आता बंडखोराच्या मागे केदार व बर्वे उभे आहेत. शिवसैनिक पेटून उठला तर तो कुणाचेही एकत नाही. सरकारने पाण्यापासून तर कफनपर्यंत टॅक्स लावला आहे. कापसाला भाव नाही. आमचा लढा गद्दारांशी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला ताकद देण्याचे आवाहन जाधव यांनी केले.

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sunil Kedarसुनील केदारcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४