शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
6
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
7
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
8
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
9
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
10
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
11
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
12
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
13
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
14
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
15
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
16
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
17
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
18
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
19
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
20
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?

“बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया”; सुनेत्रा पवारांकडून कौतुकोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 1:34 PM

Sunetra Pawar News: देशातील विकास ही पंतप्रधान मोदींची किमया असून, बारामतीतील विकास ही अजित पवारांची किमया आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

Sunetra Pawar News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील टप्प्यांतील मतदानांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले. महायुतीची एक मोठी सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील बडे नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ ही सभा झाली. या सभेला संबोधित करताना सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगला विकास केला आहे. सर्व क्षेत्रात मोदींनी आपली विशेष कामगिरी बजावली आहे. मोदी देशासाठी जीव झोकून काम करत आहेत. जनतेच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास आहे. देशातील प्रत्येक वर्गातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. देशातील रस्ते, मंगलयान, चांद्रयान सारख्या मोहिमा ही मोदींची किमया आहे. त्यामुळे जनतेच्या मनात मोदी आणि मोदीच आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. 

बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया

गेल्या १० वर्षांत बारामतीत झालेली विकास कामे राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून झाली आहेत. गेल्या २५ वर्षांत शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. बारामतीचा विकास झपाट्याने झाला आहे. बारामती एक विकासाचे मॉडेल म्हणून समोर आले आहे. हा विकास फक्त अजित पवारांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे. बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया आहे, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. 

दरम्यान, अजित पवार जनतेच्या मनातील लोकनेते आहेत. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की, त्यांची क्षमता राज्यातील जनतेला माहिती आहे. बारामतीतील जनतेने हा ध्यास अनुभवला आहे. अजित पवारांनी विकासाच्या यात्रेत जाण्याचा निर्णय घेतला आहे विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजित पवार आहेत. बारामातीचा विकास हा अजित पवाराच्या ध्येय धोरणांनी झाला आणि त्याच्या कल्पनेतून झाला. घडाळ्याला दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले मत आहे. मोदींना मत म्हणजेच विकासाला मत आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :baramati-pcबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती