सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष; पार्थ पवारांच्या राज्यसभेवर जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 06:21 IST2026-02-27T06:18:16+5:302026-02-27T06:21:17+5:30
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना भावनिक साद घालत पुढील वाटचालीचा स्पष्ट निर्धार व्यक्त केला.

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष; पार्थ पवारांच्या राज्यसभेवर जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
मुंबई : महाराष्ट्राचे कल्याण, जनतेचे भले व राष्ट्रवादीचा विचार पुढे नेणे हेच आता माझे ध्येय आहे. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच माझा परिवार आहे. अजितदादांनी जपलेल्या आत्मीयतेने व जिव्हाळ्याने हा परिवार मी
सांभाळेन, अशी ग्वाही गुरुवारी अजित पवार गटाच्या नूतन राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना भावनिक साद घालत पुढील वाटचालीचा स्पष्ट निर्धार व्यक्त केला.
गुरुवारी वरळीतील एनएससीआय डोम येथे पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्या बोलत होत्या.
पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी
पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी यावेळी घोषित करण्यात आली. छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील आम्ही सर्वांनी एकमताने पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले.