नापिकीला कंटाळून सोलापुरातील शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 10:49 IST2019-05-17T10:46:21+5:302019-05-17T10:49:21+5:30

सोलापूर जिल्ह्यात शेतकºयाची आत्महत्या

Suicides in Solapur in Maharashtra | नापिकीला कंटाळून सोलापुरातील शेतकºयाची आत्महत्या

नापिकीला कंटाळून सोलापुरातील शेतकºयाची आत्महत्या

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढू लागली- साईनाथ गायकवाड असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव- मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद

मोहोळ :  साईनाथ हणमंत गायकवाड या ४३ वर्षीय शेतकºयाने नापिकीमुळे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील नागनाथ गल्ली परिसरात घडली.  

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ गायकवाड हे सततच्या नापिकीमुळे  वैफल्यग्रस्त होते. त्यांची पत्नी मुलासह माहेरी गेल्यामुळे घरी कोणीच नव्हते. गुरुवारी (ता. १६ )  त्यांनी साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला.  यावेळी घरातून आवाज येत असल्याने त्यांच्या भाच्याने धाव घेत  त्यांना  तत्काळ मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात नेले.  मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी प्रशांत गायकवाड यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून अधिक  तपास पोलीस नाईक अभिजित गाटे हे करीत आहेत.

Web Title: Suicides in Solapur in Maharashtra