शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सहा शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: September 4, 2015 00:57 IST

उस्मानाबाद, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाच शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले.

औरंगाबाद : उस्मानाबाद, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाच शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. तर सांगलीतही कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली.पानभोसी (ता़ कंधार) येथील भुजंग शंकरराव नरंगले (३४) तसेच मांडवी परिसरातील शंकर गंभीरा पवार (५५) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे़ यातील भुजंग नरंगले यांना २ एकर ३० गुंठे शेतजमीन आहे़ त्यांनी बँक तसेच खासगी सोसायटीतून सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे कर्ज घेऊन पेरणी केली़ पावसाअभावी पेरणी वाया गेली़ त्यामुळे कर्ज फेडावे कसे, या चिंतेने ग्रस्त होऊन त्यांनी बुधवारी रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ शंकर गंभीरा पवार यांनीही सततची नापिकी व वाढत्या कर्जाच्या चिंतेमुळे गुरुवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली़ उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील युवा शेतकरी योगेश विलास चव्हाण (१९) याने सततची नापिकीला कंटाळून गुरूवारी सकाळी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली़ भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील शेतकरी लक्ष्मण भाऊराव पाटील (६५) यांना कॅन्सर झाला आहे़ एकीकडे उपचारावर होणारा खर्च आणि दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातून काहीच उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली़ फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव (खुर्द) येथील संतोष दादाराव मोटे (३४) या बुधवारी दुपारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. संतोषकडे एकूण अडीच एकर जमीन असून वर्षभरापूर्वीच त्यांनी आयसीआयसीआय बँकेतून कर्ज काढून ट्रॅक्टर घेतला होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच त्यांना बँकेचा ८५ हजारांचा हप्ता भरावयाचा होता. याच विवंचनेत ते असायचे. ‘त्या’ महिलेचा मृत्यू : कुटुंबियांच्या उपासमारीने निराश होत उस्मानाबादच्या अंबी (ता़भूम) येथील मनिषा लक्ष्मण गटकळ (३२) हिने २९ आॅगस्ट रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते़ उपचार सुरू असताना गुरूवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला़मणेराजुरीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्यामणेराजुरी (सांगली) : येथील किरण बाळासाहेब जमदाडे (२३) या शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली.