लोणंद (जि.सातारा) : पिंपरे बुद्रुक (ता.खंडाळा) येथील बावड्या पिताजी शिंदे (२५, रा. पिंपरे) याने पत्नी, सासरा आणि मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी एकमेकांवर दगडफेक केली. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला.पिंपरे येथे शेतात बावड्या या युवकाने रविवारी सकाळी अकराच्या सुमारास लिंबाच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच शिंदे आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये तुफान दगडफेक झाली. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत जमाव पांगविला. पत्नी, सासरा आणि मेव्हण्याने त्रास दिल्याने बावड्या शिंदे याने आत्महत्या केली, अशी फिर्याद रात्री उशिरा बावड्या शिंदे याची आई सकू शिंदे यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सासरा लत्या इसम काळे (६५, रा. कोकराळे ) याला अटक केली.
पत्नी, सास-याच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, साता-यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 03:50 IST