पाचवड : साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणे गरजेचे आहे. फक्त साखर उत्पादनातून नफा मिळविणे आता अशक्य आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवून आगामी काळात साखर कारखानदारांनी स्वतःचे इथेनॉल विक्री पंप सुरू करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भुईंज येथील किसन वीर सह. साखर कारखाना येथे आयोजित देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मदत व पुनर्वसन मंत्री आणि किसन वीर कारखाना अध्यक्ष मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, प्रमोद शिंदे उपस्थित होते.
मंत्री गडकरी म्हणाले, ‘शेतकरी फक्त अन्नदाता नसून तो आता इंधनदाता झाला पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या जागतिक पर्यावरणदिनी ८० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आम्ही बाजारपेठेत विक्रीकरता दाखल करीत आहे. भविष्यात शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्याच्या सूचना वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांना दिल्या आहेत. शेतीकरता वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री इथेनॉल किंवा बायो-सीएनजीवर चालविल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. हायड्रोजन भविष्य असून त्याची किंमत शंभर रुपयांपर्यंत आणता आली तर आपला देश इंधन आयात करणारा देश नाही तर इंधन निर्यात करणारा देश निर्माण होईल.
मंत्री मकरंद पाटील म्हणाले, या पुरस्काराची उंची व पुरस्कार मूर्ती नितीन गडकरी हा खरा संगम या परिसराला पाहिला मिळाला. हे आमचे भाग्य आहे.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचा आवाका व नजरेतील विकासकामांचे नियोजन हे या राज्याच्या बांधकाम खात्याने अनुभवले आहे. यापुढे देशातील महामार्ग सुखकर करीत असताना माझ्या आणि मकरंद पाटील यांच्या मतदार संघाकडे विशेष लक्ष देतील, असा विश्वास आहे. उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी स्वागत केले. संचालक दिलीप पिसाळ यांनी आभार मानले.
Web Summary : Nitin Gadkari urges sugar factories to prioritize ethanol production and establish their own ethanol pumps for increased profitability and reduced pollution. He envisions farmers as fuel providers. The government aims for 80% ethanol vehicles soon.
Web Summary : नितिन गडकरी ने चीनी मिलों से इथेनॉल उत्पादन को प्राथमिकता देने और अपने इथेनॉल पंप स्थापित करने का आग्रह किया, जिससे मुनाफा बढ़ेगा और प्रदूषण कम होगा। उनका लक्ष्य किसानों को ईंधन प्रदाता बनाना है। सरकार जल्द ही 80% इथेनॉल वाहनों का लक्ष्य बना रही है।