शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

आंबोलीमधील कावळेसाद दरीत पुन्हा दोन मृतदेह सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 14:53 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीजवळील कावळेसाद पॉइंट येथील दरीत पुन्हा एकदा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

सावंतवाडी -  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीजवळील कावळेसाद पॉइंट येथील दरीत पुन्हा एकदा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून, हे मृतदेह कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी सावर्डे येथील सिध्दार्थ मोरे व नयना मोरे ही दोघे चुलत भाउ बहीण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  काही दिवसांपूर्वी सांगली येथील अनिकेत कोथळे याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर कोथळे याला पोलिसांनी आंबोलीतील महादेवगड पॉर्इंट येथे आणून जाळले होते.  त्यानंतर कोल्हापूर येथील एका शिक्षकाचा मृतदेह येथे आढळला होता. आंबोली येथील कावळेसाद दरीत दोन मृतदेह आढळल्याचे वृत्त आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केल्यावर हे मृतदेह कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी सावर्डे येथील सिध्दार्थ मोरे व नयना मोरे ही दोघे चुलत भाउ बहीण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  सिध्दार्थ मोरे व नयना मोरे ही दोघे चुलत भाऊ-बहीण एक महिन्यापूर्वी दुचाकीवरून आंबोलीत आले होते. त्यानंतर पोलिसांना कावळेसाद पाँईटजवळ त्यांची दुचाकी बेवारस स्थितीत आढळली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून सदर दुचाकी कोल्हापूर जिल्हयातील मुरगूड पोलिसाच्या ताब्यात दिली होती. मुरगुड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल आहे. दरीत दोघाच्याही मृतदेहाचे शिल्लक आहेत. या अवशेषांच्या कपड्यांवरून ओळख पटवण्यात आली आहे. मृतदेह दरीतून वर आणण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.  

दरम्यान, सांगली येथील अनिकेत कोथळेबरोबरच गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आंबोली येथील दूरक्षेत्राबरोबरच कावळेसादकडे जाणा-या रस्त्यावर नवीन पोलीस तपासणी नाका उभारला आहे. या नाक्यावर दिवस-रात्र चार पोलीस कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंबोली दूरक्षेत्राला अतिरिक्त पोलीस कर्मचारी देण्यात आले असून, सीसीटीव्हीही सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनSawantvadi Police Stationसावंतवाड़ी पोलिस स्टेशनDeathमृत्यू